आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPLचा रोमांच:कोहलीने तोडला कोरोना नियम; टी-20मध्ये 9 हजार धावा करणारा पहिला भारतीय देखील बनला; रबाडाने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा 4 गडी बाद केले

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलचे 13 वे सत्र कोरोनाव्हायरसदरम्यान यूएईत प्रेक्षकांविना खेळले जात आहे. खेळाडू आणि स्टाफच्या सुरक्षेसाठी बायो-सिक्योर वातावरण तयार करण्यात आपे. तर आयसीसीने देखील चेंडूवर लाळ लावण्यासारखे अने प्रतिबंध आधीच लावले आहेत. तथापि, खेळाडूंची सवय त्यांना चुका करण्यास कारणीभूत ठरते. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीदेखील त्याला बळी पडला.

दिल्ली कॅपिटलसोबत झालेल्या सामन्यात कोहलीने क्षेत्ररक्षणानंतर चेंडूवर लाळ लावत असताना लगेच त्याला नियम आठवले आणि तो थांबला. पण तोपर्यंत त्याने चेंडूवर हात फिरवला होता. याआधी राजस्थान रॉयल्सचा रॉबिन उथप्पा याने देखील कोलकाता विरुद्धच्या सामन्यात चेंडूवर लाळ लावली आहे.

कोहलीने सामन्यात 43 धावांची खेळी केली, मात्र बंगळुरूला विजय देऊ शकला नाही. दिल्लीने हा सामना 59 धावांनी जिंकला

कोहलीने एकूण टी-20मध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या. असा करणारा तो पहिला भारतीय आहे.

दिल्लीचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडाने 24 धावांत 4 बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासात त्याने तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली.

डावाच्या पहिल्याच षटकात रबाडाने त्याच्या चेंडूवर आरोन फिंचचा झेल सोडला.

मार्कस स्टोइनिसने बेंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पादक्कलचा सीमारेषेवर शानदार झेल पकडला.

शिखर धवनने बंगळुरूचा एबी डिव्हिलियर्सचा झेल टिपला आणि 9 धावांनी त्याला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

शिवम दुबेला कगिसो रबाडाने त्रिफळाचीत केले. दुबेने 12 चेंडूत 11 धावांची खेळी केली.

मोहम्मद सिराज देखील अॅनरिज नोर्तजेचेय चेंडूवर त्रिफळाचीत झाला.

दिल्लीसाठी मार्कस स्टोइनिसने 26 चेंडूत सर्वाधिक 53 धावांची नाबाद खेळी केली.

दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेल सामनावीर ठरला. त्याने 4 षटकांत 18 धावा देत 2 बळी घेतले. अक्षरने फिंच आणि मोइन अलीला बाद केले.

दिल्ली कॅपिटलसचे प्रशिक्षक मोहम्मद कैफ संघाच्या कामगिरीवर खूष दिसून आले.

दिल्ली कॅपिटलचे मालक पार्थ जिंदल आणि त्यांची पत्नी अनुश्री संघाला प्रोत्साहित करताना

बातम्या आणखी आहेत...