आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:पंजाबच्या किंग्जला शेवटची संधी, कोलकाता व राजस्थानसाठी करा वा मरा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किंग्ज इलेव्हन पंजाब स्पर्धेच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे आता पुढच्या फेरीतील प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवण्याची आता पंजाबच्या किंग्जला शेवटची संधी आहे. यातील विजयाने टीमला प्ले आॅफचा प्रवेश निश्चित करता येईल. पंजाबला राजस्थान रॉयल्स विरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर टीमला प्लेऑफसाठी एक धक्का बसला. रविवारी टीमचा सामना चेन्नई सुपरकिंग्जशी होईल. चेन्नई विरुद्ध विजय मिळवल्यास १४ गुण होतील. मात्र, प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी इतर सामन्यांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.

कोलकाता व राजस्थानसाठी करा वा मरा
आयपीएलच्या प्ले आॅफमधील प्रवेशासाठी आता काेलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान राॅयल्स संघांनीही कंबर कसली आहे. गत सामन्यातील विजयाने राजस्थान संघाने यासाठीचा आपला दावा मजबुत केला. याशिवाय या टीमने यापुर्वीच्या सामन्यात मुंबईला पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळे सलगच्या दाेन माेठ्या विजयाने आता आपला प्रवेशाचा मार्ग अधिक सुकर केला आहे. मात्र, या टीमसाठी ही वाट अधिक खडतर आहे. कारण, या टीमसमाेर आज रविवारी काेलकाता संघाचे तगडे आव्हान असेल. मात्र, काेलकाता संघात दर्जेदार फलंदाजीच्या अभावाची चिंता आहे. नव्या कर्णधार माॅर्गनच्या नेतृत्वात टीम विजयासाठी झंुज देताना दिसणार आहे.