आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फोटोंमध्ये पहा IPL चा रोमांच:धोनीने ठोकला टी-20 करिअरमधला 300 वा षटकार, विराटला चिअर करताना दिसली अनुष्का; केकेआरसाठी पुन्हा भाग्यवान ठरला शाहरुख

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात महेंद्र सिंह धोनीने आपल्या टी-20 कारकिर्दीतील 300 षटकार पूर्ण केले. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी 6 चेंडूत 10 धावाच करू शकला आणि त्याच्या संघांने बेंगळुरूकडून 37 धावांनी सामना गमावला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 90 धावांची खेळी केली. त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील स्टेडियममध्ये त्याला चिअर करताना दिसली.

त्यापूर्वी दुपारी कोलकाता नाइट राइडर्सने किंग्स इलेव्हन पंजाबला 2 धावांनी पराभूत केले. केकेआरचा मालक शाहरुख खान संघासाठी पुन्हा एकदा भाग्यवान ठरला. याआधी तो या सीझनमध्ये 2 सामने पाहण्यासाठी गेला होता आणि तेव्हाही केकेआरचा विजय झाला होता.

महेंद्र सिंह धोनीने सामन्यात एकच षटकार लगावला. त्याने आंतरराष्ट्रीय, आयपीएलसह इतर स्पर्धांमध्ये आतापर्यंत 323 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 300 षटकार ठोकले. याबाबतीत रोहित शर्मा (375) आणि सुरेश रैना (311) नंतर तिसरा भारतीय बनला आहे.

दुसरा षटकार ठोकण्याच्या नादात धोनी बाद झाला. गुरकीरत सिंहने सीमारेषेवर त्याचा झेल पकडला.

विराट कोहलीने सामन्यात 52 चेंडूत नाबाद 90 धावांची खेळी केली.

कोहलीने फिफ्टी केल्यानंतर अनुष्का शर्मा अशा प्रकारे चिअर करताना दिसली.

विराट दोन धावा घेण्याच्या नादात धावबाद होताना थोडक्यात बचावला. महेंद्रसिंग धोनी काही सेकंदांसाठी चुकला.

आयपीएलच्या 24 व्या सामन्यात केकेआरने किंग्स इलेव्हन पंजाबचा 2 धावांनी पराभव केला. विजयानंतर संघातील खेळाडू आनंदीत दिसले.

कोलकाता संघाचा मालक शाहरुख खान देखील मॅच पाहण्यासाठी दुबईत पोहोचला. तो या सीझनमध्ये संघासाठी भाग्यवान ठरत आहे.

किंग्जचा इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने कोलकाता विरुद्ध सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. मात्र तरीही पंजाबचा पराभव झाला.

कोलकाताचा अष्टपैलू आंद्रे रसेल दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला.

चेन्नई सुपर किंग्जच्या अंबाती रायुडूने 40 चेंडूत सर्वाधिक 42 धावा केल्या. इसुरु उडानाने त्याला क्लीन बोल्ड केले.

आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या नारायण जगदीसनने 28 चेंडूत 33 धावा केल्या.

चेन्नईच्या फाफ डु प्लेसिसने बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडिककलचा शानदार झेल घेतला.