आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPLचा रोमांच:धोनीने नेटमध्ये केली बॉलिंगची प्रॅक्टिस, मॅचमध्ये मारला सिझनचा चौथा सर्वात लांब षटकार, बॉल 102 मीटर दूर गेला

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल सिझन-13 मधील 56 सामन्यांपैकी अर्धे सामने खेळून झाले आहेत. दुसऱ्या हाफमधील पहिला म्हणजे 29 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)ने संघाने 20 धावांनी जिंकला. हैदराबादचा हा पाचवा पराभव आहे. या विजयामुळे महेंद्रसिंग धाेनीचा संघ पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर आला आहे.

या सामन्यापूर्वी विकेटकिपर महेंद्रसिंग धाेनीने नेटमध्ये बॉलिंगची प्रॅक्टिस केली आणि फुटबॉलही खेळला होता, परंतु मॅचमध्ये वेगळेच चित्र पाहण्यास मिळाले. धोनीने या सिझनचा सर्वात लांब षटकार या मॅचमध्ये मारला. बॉल 102 मीटर दूर गेला. यापूर्वी किंग्स इलेव्हन पंजाबच्या निकोलस पूरनने सिझनचा सर्वात लांब षटकार (106 मीटर) मारला आहे.

धोनीने 13 बॉलमध्ये 21 धावा काढल्या. 2 चौकार आणि एक षटकार मारला.
धोनीने 13 बॉलमध्ये 21 धावा काढल्या. 2 चौकार आणि एक षटकार मारला.
हैदराबादचा गोलंदाज संदीप शर्मा आपल्याच बॉलवर धोनीचा झेल घेण्याचा प्रयत्न करताना. संदीपने हवेत उत्कृष्ट झेप घेतली परंतु झेल पकडण्यात अपयशी राहिला.
हैदराबादचा गोलंदाज संदीप शर्मा आपल्याच बॉलवर धोनीचा झेल घेण्याचा प्रयत्न करताना. संदीपने हवेत उत्कृष्ट झेप घेतली परंतु झेल पकडण्यात अपयशी राहिला.
धोनीने ऑलराउंडर सॅम करनला पहिल्यांदा ओपनींगला पाठवून सर्वांना चकित केले. सॅमने 31 धावा काढल्या. संदीप शर्माने सॅमला बोल्ड केले.
धोनीने ऑलराउंडर सॅम करनला पहिल्यांदा ओपनींगला पाठवून सर्वांना चकित केले. सॅमने 31 धावा काढल्या. संदीप शर्माने सॅमला बोल्ड केले.
जडेजाने बाउंड्री लाइनवर हैदराबादचा फलंदाज प्रियम गर्गचा उत्कृष्ट झेल टिपला.
जडेजाने बाउंड्री लाइनवर हैदराबादचा फलंदाज प्रियम गर्गचा उत्कृष्ट झेल टिपला.
मॅच दरम्यान धाव घेताना शाहबाज नदीम आणि गोलंदाज ब्राव्हो यांच्यामध्ये धडक झाली.
मॅच दरम्यान धाव घेताना शाहबाज नदीम आणि गोलंदाज ब्राव्हो यांच्यामध्ये धडक झाली.
हैदराबादचा फलंदाज मनीष पांडेला ब्राव्होने रनआउट केले.
हैदराबादचा फलंदाज मनीष पांडेला ब्राव्होने रनआउट केले.
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून विलियम्सनने सामन्यात एकाकी झंुज दिली
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून विलियम्सनने सामन्यात एकाकी झंुज दिली
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सेक्रेटरी जय शाह मॅच पाहण्यासाठी पोहोचले होते.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सेक्रेटरी जय शाह मॅच पाहण्यासाठी पोहोचले होते.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser