आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीने चेन्नईला 5 विकेट्सनी हरवले:कॅपिटल्सकडून सुपर किंग्सचा सीझनच्या दोन्ही सामन्यात पराभव, धवनच्या 101 धावांच्या खेळीमुळे दिल्ली पुन्हा गुणतालिकेच्या शिखरावर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सनी पराभव केला. या सीझनमध्ये दिल्लीने चेन्नईला दुसऱ्यांदा धूळ चारली. दिल्लीने 9 पैकी 7 सामने जिंकत गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. दिल्लीसाठी शिखर धवनने 101 धावांची धडाकेबाज खेळी करत आयपीएलमधील पहिले शतक झळकावले.

स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 180 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 5 गडी गमावून 185 धावा करत सामना जिंकला. दिल्लीच्या शिखर धवन व्यतिरिक्त मार्कस स्टोइनिसने 24 आणि कर्णदार श्रेयस अय्यरने 23 धावांची खेळी केली. चेन्नईसाठी दीपक चाहरने सर्वाधिक 2 गडी बाद केले.

दीपकने दिल्लीला सुरुवातीला 2 झटके दिले

दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. पृथ्वी शॉ सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्याच षटकात बाद झाला. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने सुरुवातीलाच दिल्लीला 2 झटके दिले. त्याने पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. सलामीवीर शिखर धवनने एकहाती डाव सांभाळात संघाला विजय मिळवून दिला.

चेन्नईची खराब सुरुवात

चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर सॅम करन भोपळा न फोडताच तंबूत परतला. तुषार देशपांडेने त्याला एनरिच नोर्तजेच्या हाती झेलबाद केले. यानंतर डु प्लेसिस आणि शेन वॉटसन (36)ने दुसऱ्या विकेटसाठी 67 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. वॉटसनला नोर्तजेने बोल्ड केले. नोर्तजेने सामन्यात दुसरी विकेट घेताना महेंद्र सिंह धोनीला विकेटकीपर अॅलेक्स कॅरीच्या हाती झेल बाद केले.

चेन्नई संघात केदार जाधवचे पुनरागमन

चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने संघात एक बदल केला आहे. पीयूष चावला ऐवजी केदार जाधवला संधी देण्यात आली. तर दिल्लीच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यात जखमी झालेला श्रेयस अय्यर तंदरुस्त आहे.

दोन्ही संघ

दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे

चेन्नई : सॅम करन, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाती रायडू, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, शार्दूल ठाकुर आणि कर्ण शर्मा।

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser