आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोंमध्ये पाहा IPLचा रोमांच:लीगमध्ये सलग 2 शतक ठोकणारा पहिला खेळाडू बनला शिखर धवन, पंजाब टॉप-5 मध्ये पोहोचल्याने प्रीती झिंटा खुश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 सीझनच्या 38 व्या सामना शिखर धवन, ख्रिस गेल आणि निकोलस पूरनच्या फलंदाजीमुळे रोमांचक राहिला. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन लीगच्या इतिहासात सलग 2 शतके करणारा पहिला खेळाडू बनला. त्याने 106 धावांची नाबाद खेळी केली. तर किंग्स इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने 13 चेंडूत 29 धावा केल्या.

गेलने तुषार देशपांडेच्या पहिल्या आणि डावाच्या 5 व्या षटकात 26 धावा खेचल्या. गेल या षटकात 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले. या सीझनमधील पॉवर-प्लेमधील हे सर्वात महागडे षटक ठरले.

पंजाबसाठी निकोलस पूरनने 28 चेंडूत 53 धावांच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्लीचा 5 विकेट्सनी पराभव केला. पंजाबने सलग अव्वल-3 संघांना पराभूत करून गुणतालिकेत 5 वे स्थान गाठले. या विजयामुळे पंजाबची मालक प्रिती झिंटाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण करणारा 5 वा खेळाडू बनला. त्याच्या 106 धावांच्या खेळीमुळे दिल्लीने 165 धावांचे लक्ष्य दिले.

165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत पंजाबच्या निकोलस पूरनने 28 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. निकोलसच्या या खेळीमुळे पंजाबने 5 विकेट्सनी सामना जिंकला.

पंजाबच्या ख्रिस गेलने स्फोट फलंदाजी करत 13 चेंडूत 29 धावा केल्या. त्याने एकाच षटकात 3 चौकार आणि 2 षटकार खेचले. गेलला फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने क्लिन बोल्ड केले.

सामन्यादरम्यान फिरकीपटू अश्विन ख्रिस गेलच्या शू लेस बांधताना दिसला.

ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूत 32 धावा केल्या. त्याने तीन चौकार ठोकले.

पंजाबचा सलामीवीर मयंक अग्रवाल 5 धावा करु शकला. अश्विनच्या थ्रोवर तो विकेटकीपर ऋषभ पंतने त्याला धावबाद केले.

दिल्लीचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिसने डावाच्या 19 व्या षटकात 5 व्या चेंडूवर दीपक हूडाचा झेल सोडला.

निकोलस पूरनला धावबाद करण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिल्लीचा विकेटकीपर ऋषभ पंत.

सामना जिंकल्यानंतर पंजाब आणि दिल्लीतील खेळाडू अशी मजा करताना दिसले.

पंजाबचा फलंदाज जिमी नीशमने षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. षटकार ठोकताच प्रिती झिंटाने अशाप्रकारे आनंद व्यक्त केला.

सामन्याआधी पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग रणनीतीवर चर्चा करताना.

कोरोना महामारीमुळे आबुधाबी येथील मैदान सामन्यापूर्वी सॅनिटाइज करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...