आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईचा दिल्लीवर 9 गडी राखून विजय:दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्या सामन्यात पराभूत, प्ले ऑफसाठी अडचणी वाढल्या; मुंबई अव्वलस्थानी कायम

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सत्रातील 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 9 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. दिल्लीचा हा सलग चौथा पराभव आहे. या पराभवासोबतच दिल्लीचा प्ले-ऑफमध्ये जाण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आता दिल्लीला पुढच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. तर मुंबई 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.

सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दुबईत खेळलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीने मुंबईला 111 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मुंबईने 14.2 षटकांत एका मोबदल्यात 111 धावा करत सामना खिशात घातला. मुंबईच्या ईशान किशानने IPL मध्ये 6 वे अर्धशतक करत 72 धावांची नाबाद खेळी केली. सूर्यकुमार कुमार यादव 12 धावांवर नाबाद राहिला. तर दिल्लीच्या एनरिच नोर्तजेने एक गडी बाद केला.

मुंबईची चांगली सुरुवात

मुंबईचे सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि ईशान किशनने सावध खेळी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. दोघांनी पावर-प्लेमध्ये 38 धावा खेचल्या. यानंतर ईशान किशनने फटकेबाजी करत रनरेट वाढवला. दोघांमध्ये 68 धावांची भागीदारी झाली. नोर्तजेने डिकॉकला (26) बाद करत ही भागीदारी मोडून काढली.

दुबईमध्ये सीझनमधील सर्वात लहान लक्ष्य

दिल्लीने 20 षटकांत 9 गडी बाद 110 धावा केल्या. हे दुबईत या सीझनमधील सर्वात लहान आव्हान आहे. याआधी किंग्स इलेव्हन पंजाबने सनराइजर्स हैदराबादला 127 धावांचे लक्ष्य दिले होते कर्णधार श्रेयस अय्यरने 25 आणि ऋषभ पंतने 21 धावांची खेळी केली. तर मुंबईसाठी जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 3 गडी बाद केले. राहुल चाहर आणि नाथन कूल्टर-नाइलने प्रत्येकी एक बळी घेतला.

दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले

दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन सलग दुसऱ्या सामन्यात भोपळाही न फोडता बाद झाला. पहिल्या षटकात तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. यानंत पृथ्वी शॉ देखील जास्त काळ टिकू शकला नाही आणि 10 धावा काढून बाद झाला. दोन्ही सलामीवीरांना ट्रेंट बोल्टने बाद केले.

श्रेयस-ऋषभला मोठी धावसंख्या करता आली नाही

दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली. दोघांना चांगली सुरुवात मिळाली पण मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. अय्यर 25 धावांवर राहुल चाहरच्या चेंडूंवर बाद झाला. यानंतर पंतला (21) जसप्रीत बुमराहने बाहेरचा मार्ग दाखवला.

मुंबईत 2 आणि दिल्लीत 3 बदल

मुंबई संघात 2 बदल करण्यात आले. हार्दिक पंड्याला आजच्या सामन्यासाठी विश्रांती दिली आहे. त्याच्या जागीत जयंत यादव संघात सामिल केले. याशिवाय जेम्स पॅटिन्सनच्या जागी नाथन कूल्टर-नाइल ला संघात संधी दिली आहे. तर दिल्लीच्या संघात 3 बदल करण्यात आले. अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि तुषार देशपांडे यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ आणि हर्षल पटेल संघात संधी दिली आहे.

दोन्ही संघ

मुंबई : क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, क्रुणाल पंड्या, कीरोन पोलार्ड (कर्णधार), नाथन कूल्टर-नाइल, राहुल चाहर, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन, प्रवीण दूबे आणि एनरिच नोर्तजे।