आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:बॉलिंग आणि फिल्डिंगने 23व्या सामन्याला रोमांचक बनवले, हेटमायरने 3 उत्कृष्ट झेल टिपले, 45 धावाही काढल्या

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल सिझन 13च्या 23 व्या मॅचमध्ये बॉलिंग आणि फिल्डिंगची रोमांचक जुगलबंदी पाहण्यास मिळाली. पहिले राजस्थान रॉयल्सने उत्कृष्ट बॉलींग आणि फिल्डिंग केली, ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्स 185 धावांचेच टार्गेट देऊ शकले. या सीझनमध्ये शारजाह मैदानावरील हे सर्वात छोटे लक्ष्य होते. त्यानंतर दिल्ल्लीनेही दमदार बॉलींग आणि फिल्डिंग करत राजस्थानला 138 धावांवर रोखून 46 धावांनी सामना जिंकला.

मॅचमध्ये दिल्लीचा फलंदाज शिमरॉन हेटमायरचा पूर्ण दबदबा दिसला. हेटमायरने पहिले दिल्लीसाठी 24 बॉलमध्ये सर्वात जास्त 45 धावा केल्या. त्यानंतर फिल्डिंगमध्ये स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन आणि श्रेयस गोपालचे 3 उत्कृष्ट झेल घेतले.

हेटमायरने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज संजू सॅमसनचा झेल घेतला. संजू 9 बॉलमध्ये 5 धावाच काढू शकला.

हेटमायरच्या उत्कृष्ट झेलमुळे श्रेयस गोपाल 2 धावा काढूनच तंबूत परतला.

फलंदाजीमध्ये हेटमायरने सहाव्या क्रमांकावर येऊन 24 बॉलमध्ये 45 धावा काढल्या.

राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जैस्वालने 36 बॉलमध्ये 34 धावा काढल्या.

राजस्थानसाठी राहुल तेवतियाने सर्वात जास्त 38 धावा काढल्या. रबडाने तेवतियाला बोल्ड केले.

दिल्लीचा ऑलराऊंडर मार्कस स्टाेइनिस बॉलींगमध्ये आक्रमक दिसला. स्टाेइनिसने 2 विकेट घेतल्या आणि फलंदाजीमध्ये 39 धावा काढल्या.

राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने स्टाेइनिसचा उत्कृष्ट झेल घेतला.

राजस्थानच्या खेळाडू एंड्र्यू टाय फील्डिंग दरम्यान बॉल रोखताना.

दिल्लीचा फास्ट बॉलर रबाडा डाय मारून बॉल अडवताना. रबडाने या सामन्यात सर्वात जास्त 3 विकेट घेतल्या.