आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये आज:दिल्लीची पहिल्या, हैदराबादची नजर तिसऱ्या फायनल प्रवेशावर

दुबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हैदराबादची 2 सामन्यांत दिल्ली टीमवर मात

आयपीएल २०२० च्या दुसऱ्या पात्रता सामन्यात रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद टीम फेव्हरेट असेल. दोन्ही संघांचा प्रवास आतापर्यंत वेगवेगळा राहिला. हैदराबादची सुरुवात खूप खराब झाली होती. मात्र, संघाने अखेरच्या सामन्यात सलग विजय मिळवत प्ले आॅफ गाठले. दुसरीकडे, दिल्ली सलग अव्वल दोनमध्ये सहभागी होती. मात्र, अखेरच्या ५ लीग सामन्यांत त्यांना केवळ एक विजय मिळवता आला. आता दोन्ही टीम फायनलमध्ये स्थान मिळवू इच्छितात. दिल्लीने एकदाही फायनल खेळली नाही, हैदराबाद २०१६ मध्ये विजेता बनली होती.

दिल्लीची मुख्य अडचण त्यांचे प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ व ऋषभ पंत यांचा फाॅर्म आहे. केवळ शिखर धवन लयात दिसतोय. रहाणेची बॅट केवळ एका सामन्यात तळपली. हैदराबादसाठी वॉर्नरने सर्वाधिक धावा काढल्या आहेत. विल्यम्सनने त्याला चांगली साथ दिली. एलिमिनेटरमध्ये या खेळीमुळे विजय मिळवता आला. संघात परतलेल्या विंडीजचा फलंदाज होल्डरने महत्त्वाचे योगदान दिले. त्याने बॅट व चेंडू दोन्ही प्रकारांत विरोधी संघावर दबाव बनवला. मात्र, फलंदाजीत मधली फळी कमजोर आहे, दिल्लीला विजयासाठी त्यांच्यावर दबाव बनवावा लागेल. दिल्ली गोलंदाजीत बदल करू शकते. फायनलच्या तिकिटांच्या सामन्यात दोन्ही टीम सर्वस्व पणाला लावणार असल्याने अबुधाबीमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळेल.

ओव्हरऑल हैदराबादचे पारडे जड
दोन्ही संघांदरम्यान एकूणच हैदराबादचे पारडे जड आहे. दोघांत आतापर्यंत १७ सामने खेळवण्यात आले. यात दिल्लीने ६ आणि हैदराबादने ११ सामने जिंकले आहेत. यंदाच्या सत्रातील दोन्ही सामन्यांत हैदराबादने १५ आणि ८८ धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्लीची या सामन्यातील वाट अधिकच खडतर आहे.

बातम्या आणखी आहेत...