आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:मनोबल उंचावण्यासाठी दिल्ली टीम करतेय योगा, वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमध्ये न खेळणारा हरभजन करणार समालोचन

दुबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी कसोटीपूर्वी तयारीची संधी

आयपीएल-१३ साठी सर्व संघ यूएईत जैवसुरक्षित वातावरणात आहेत. संघांनी आपल्या खेळाडूंचा कंटाळा दूर करून प्रेरित करण्याची व्यवस्था केली आहे. मुंबईने प्ले झोन बनवले, जेथे खेळाडू व त्यांचे कुटुंबाचे मनोरंजन होते. दिल्ली कॅपिटल्सने खेळाडूंसाठी रविवारी सकाळी योगाचे सत्र घेऊन मनाेबल उंचावत आहेत.

वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमध्ये न खेळणारा हरभजन करणार समालोचन

ऑफस्पिनर हरभजनसिंग वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमध्ये खेळत नाही, मात्र तो तरीदेखील दिसणार आहे. माहितीनुसार, हरभजनने स्टार इंडियासोबत करार केला आहे. तो लीगदरम्यान हिंदीमध्ये समालोचन करताना दिसेल. स्टार इंडियाने यूएईसह मुंबईत जैवसुरक्षित वातावरणाची व्यवस्था केली आहे. अशात हरभजनसिंगला समालोचनादरम्यान कोठेही जाता-येता येणार नाही. त्याच्यासह इतर समालोचक मुंबईतच राहतील. यंदा लीगमध्ये चाहत्यांची उपस्थिती नसेल. अशात व्ह्यूअरशिपमध्ये मोठी वाढ झालेली दिसेल.

आयपीएल भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी कसोटीपूर्वी तयारीची संधी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपलच्या मते, कोरोना काळात क्रिकेट खेळणे गत सर्व अनुभवापेक्षा वेगळे आहे. ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यात वर्षाअखेरीस सुरू होणाऱ्या मालिकेपूर्वी आयपीएल खेळाडूंना सरावाची संधी आहे. ३ डिसेंबरपासून दोन्ही देशांत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. आयपीएल समाप्त होताच भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. त्यांनी म्हटले की, “एक गोष्ट आहे, जेथे इच्छा आहे, तेथे मार्ग आहे आणि उत्कृष्ट खेळाडू समाधानासाठी समर्पित असतात.’ नव्या नियमामुळे खेळाडूंच्या अडचणी वाढू शकतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser