आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 15 वा सामना रॉयल चँलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आबुधाबी येथे खेळला जात आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि बंगळुरुला 155 धावांचे लक्ष्य दिले. राजस्थानने दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूने 19.1 ओव्हरमध्ये 158 धावा काढून मोठा विजय नोंदवला. या सामन्यात विराटने दमदार फलंदाजी केली. यात त्याने आपली आयपीएल करिअरमधले 37 वे अर्धशतक झळकावले. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राजस्थानकडून महिपाल लोमरोरने सर्वाधिक 47 रन केले. आरसीबीच्या यजुवेंद्र चहलला 3 विकेट्स मिळाल्या. यासोबतच चहलने सीजनमध्ये 8 विकेट घेणाऱ्या पंजाबच्य ामोहम्मद शमीची बरोबरी केली आहे. परंतू, कमी इकोनॉमीमुळे चहल टॉपवर आहे.
दोन्ही संघ
राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवतिया, टॉम करन, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरोर आणि जयदेव उनादकट.
रॉयल चँलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, एबी डिव्हिलियर्स (यष्टिरक्षक), शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, इसुरु उडाना, नवदीव सैनी, अॅडम झॅम्पा आणि यजुवेंद्र चहल।
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.