आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL ची डबल सुपर ओव्हर:मयंकचे जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि गेलच्या धडाकेबाच फलंदाजीमुळे मुंबईचा पराभव, पंजाबच्या थरारक विजयामुळे प्रीती झिंटा खूष

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल सीझन 13 च्या 36 वा सामना स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात रोमांचक ठरला. मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेला हा सामना आधी टाय झाला. नंतर झालेली सुपर ओव्हर देखील टाय झाली. मात्र दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईविरोधात 12 धावांचा पाठलाग करत सामना खिशात घातला.

या दरम्यान पंजाबच्या मयंक अग्रवालने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि ख्रिस गेलने फलंदाजी दाखवली. त्याचवेळी किंग्जच्या शमी आणि मुंबईच्या बुमराहच्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याआधी दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईच्या फलंदाजी दरम्यान मयंकने बाउंड्रीवर षटकाराला रोखत पंजाबसाठी 4 धावा वाचवल्या.

यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ख्रिस गेलने ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. पुढच्या बॉलवर एक धाव घेतला. यानंतर मंयकने दोन चौकार ठोकत विजय मिळवला.

सामन्याच्या दुसर्‍या सुपर ओव्हरमध्ये 12 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस गेलने ट्रेंट बोल्टच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता.

यानंतर मयंक अग्रवालने सलग दोन चौकार ठोकत पंजाबला विजय मिळवून दिला. मयंकने अशाप्रकारे विजयाचा आनंद साजरा केला.

दुसर्‍या सुपर षटकात मयंकने चमकदारपणे केरॉन पोलार्डचा षटकार सीमारेषेवर रोखला आणि संघासाठी 4 धावा वाचवल्या

मुंबईसाठी पहिली सुपर ओव्हर क्विंटन डिकॉक आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी खेळली. पंजाबने 5 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात मुंबईला सुद्धा 5 धावा करता आल्या.

विकेटकीपर लोकेश राहुलने क्विंटन डिकॉकला धावबाद करत पहिला सुपर ओव्हर टाय केला.

जसप्रीत बुमराहने सामन्यात 24 धावा देत 3 गडी बाद केले. पहिली सुपर ओव्हर त्यानेच टाकली, ज्यात पंजाबला 5 धावांवर रोखले.

पहिल्या सुपर ओव्हरच्या वेळी मयंक अग्रवाल आणि ख्रिस गेल ड्रेसिंग रुममध्ये अशा अंदाजात दिसले.

या सामन्यात मयंक सलामीला आला होता, पण काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने 10 चेंडूंत 11 धावा फटकावल्या. बुमराहने त्याला बाद केले.

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल 51 चेंडूत 77 धावांवर खेळत होता. सामना पंजाबच्या बाजूने दिसत होता, तेवढ्यात बुमराहने राहुलला क्लीन बोल्ड करत सामना फिरवला.

सामन्यात मुंबईकडून क्विंटन डिकॉकने 43 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने मुंबईसाठी सलग तिसरे अर्धशतक झळकावून सचिन तेंडुलकरची बरोबरी केली.

डबल सुपर ओव्हरमध्ये पंजाबच्या विजयानंतर प्रीती झिंटाने अशाप्रकारे आनंद व्यक्त केला.