आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल फायनल:53 दिवसांदरम्यान रंगलेल्या 60 सामन्यांनंतर ठरणार चॅम्पियन संघ; दिल्ली गोलंदाजीवर तर मुंबईचा विजय फलंदाजीवर अवलंबून

दुबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईने आतापर्यंत 5 फायनल्स खेळल्या, 4 जिंकल्या; दिल्लीची ही पहिलीच फायनल

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये मंगळवारी आयपीएल फायनल होईल. मधली फळी आणि वेगवान गोलंदाजी मुंबईचे बलस्थान आहे. दिल्लीची मात्र मधली फळी अपयशी ठरली आहे. मात्र, धवन, रबाडा व स्टॉयनिस फाॅर्मात आहेत. खरा मुकाबला मुंबईची फलंदाजी आणि दिल्लीच्या गोलंदाजीत असेल.

> आयपीएलमध्ये मुंबईने आजवर खेळलेल्या ५ फायनलपैकी ४ जिंकल्या आहेत. दिल्लीची ही पहिलीच अंतिम लढत आहे.

> मुंबईने चारही फायनल प्रथम फलंदाजी करून जिंकल्या आहेत. २०१० मध्ये धावांचा पाठलाग करताना ते हरले होते.

> यंदा मुंबई-दिल्लीतील तीन सामन्यांत मुंबईनेच विजय मिळवला आहे. यात ५ विकेट, ९ विकेट व ५७ धावांनी विजय झालेत. यामुळे मुंबईचे पारडे जड असल्याचे म्हटले जाते.

> रबाडाचे २९ बळी आहेत. आणखी ४ बळी टिपताच तो एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरू शकतो.

बातम्या आणखी आहेत...