आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:कोलकाता विजयासाठी सज्ज; आज दिल्ली करणार प्ले ऑफ प्रवेशाचा दावा मजबूत

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता नाइट रायडर्सला शनिवारी दुपारी विजयासाठी आपले सर्वस्व पणाला लावावे लागेल. टीम स्पर्धेत कठीण काळातून जात आहे. बंगळुरूने गत सामन्यात त्यांना ८४ धावांवर रोखले होते. त्यांना पुनरागमन करण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. ते सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहेत. तरीदेखील खूप काम करण्याची गरज आहे. नितीश राणा व पॅट कमिन्सच्या फाॅर्मची चिंता कायम आहे. नरेन आणि रसेल दुखापतीमुळे बाहेर झाले. त्यांच्यासाठी प्रमुख खेळाडू लयीत येणे आवश्यक आहे. दिल्ली कॅपिटल्ससमोर अनेक अडचणी आहेत. गत सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. ऋषभ पंत दुखापतीतून बाहेर आला, मात्र तो लयीत दिसत नाही. संघातील मधली फळी सक्षम नाही. हेटमायरवर त्यांचा विश्वास आहे. पृथ्वी शॉ अपयशी ठरतोय. एनरिच नोर्तजे जखमी झाल्याने संघाला धक्का बसला. त्याला लवकर तंदुरुस्त व्हावे लागेल. दिल्लीसमोरील अडचणी कमी आहेत, विजयानंतर त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.

केकेेआर, हैदराबादचे पारडे जड
विक्रम कोलकाता व हैदराबादच्या बाजूने :

आयपीएलमध्ये दिल्लीने कोलकात्याला ११ सामन्यांत पराभूत केले आणि त्यांना १३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना रद्द झाला. हैदराबादने पंजाबला ११ सामन्यांत मात दिली आणि त्यांचा केवळ ४ सामन्यांत पराभव झाला.

विजयी माेहीम कायम ठेवण्यासाठी पंजाबचे किंग्ज सज्ज
पहिल्या ७ पैकी ६ सामने गमावणाऱ्या पंजाबने गत ३ सामन्यांत सलग विजय मिळवले. तेदेखील अव्वल तीन टीम बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली विरुद्ध. मात्र, अद्यापही टीम राहुल व मयंकवर निर्भर आहे. गेलने पहिल्या सामन्यापासून आपले महत्त्व दाखवून दिले. दिल्लीविरुद्ध सामन्यात पूरन व मॅक्सवेलने महत्त्वाची कामगिरी बजावली. गोलंदाजीवर अद्याप काम करणे गरजेचे आहे. रवी बिश्नोई व मो. शमी चांगली कामगिरी करताहेत. हैदराबादसाठी राजस्थानविरुद्ध विजय योग्य वेळी मिळाला. मनीष पांडे आणि विजय शंकरने नाबाद भागीदारी करत विजय मिळवून दिला. दोघांनी वॉर्नर व बेअरस्टो लवकर तंबूत परतल्यानंतर ही कामगिरी केली. शंकरने प्रभावी गोलंदाजीदेखील केली. जेसन होल्डर. सत्रातील आपला पहिला सामना खेळत असलेल्या होल्डरने ३ बळी घेतले आणि एकाला धावबाद करत आपले महत्त्व दाखवले. हैदराबाद व पंजाब दोघांचे १० सामन्यांत ८ गुण आहेत. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचा पुढील प्रवास कठीण असेल.

बातम्या आणखी आहेत...