आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी लकी चार्म ठरली प्रिती झिंटा, गेल-मनदीपने 100 धावांची भागीदारी करुन संघाला विजय मिळवून दिला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सत्रात सोमवारी किंग्स इलेव्हन पंजाबने कोलकाता नाइट राइडर्सचा 8 विकेट्सनी पराभव केला. संघाची मालकीन प्रिती झिंटा आपल्या संघासाठी लकी चार्म ठरली. सीझनचे सुरुवातीचे सलग 5 सामने हरणारी पंजाब सलग 5 सामने जिंकत प्ले-ऑफच्या चौथ्या टीमच्या शर्यतीत सर्वात पुढे झाली आहे.

यासह, सीझनमध्ये सलग 5 विजय नोंदविणारा पंजाब दुसरा संघ ठरला आहे. पंजाब व्यतिरिक्त मुंबई देखील सलग पाच सामने जिंकली आहे. या सामन्यात मनदीप सिंह (66*) आणि ख्रिस गेल (51)ने दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी करत पंजाबला सहज विजय मिळवून दिला. या दरम्यान दोघांनी 10 चौकार आणि 7 षटकार लगावले.

सामन्याच्या पहिल्या षटकात कोलकाताचा सलामीवीर नितीश राणाचा झेल पकडल्यानंतर ख्रिस गेलने आनंद व्यक्त केला.

पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 4 षटकांत 35 धावा देऊन 3 गडी बाद केले. त्याने एकाच षटकात राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिकला बाद केले.

पंजाबचा दीपक हुड्डा शुबमन गिलला धावबाद करण्याचा प्रयत्न करताना.

कोलकाताचा कर्णधार इयन मॉर्गनने 25 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले.

कोलकाताचा सलामीवीर शुभमन गिलने IPL मधील आपले 7 वे अर्धशतक झळकावले.

कोलकाताच्या वरुण चक्रवर्तीला ख्रिस जॉर्डनने बोल्ड केले.

पंजाबची मालकीन प्रीती झिंटा तिच्या टीमच्या कामगिरीने खूप खुश होती.

पंजाबच्या रवी बिश्नोईने 4 षटकांत 20 धावा देऊन 2 गडी बाद केले. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हर देखील टाकली.

युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने आयपीएलमध्ये आपली 30 वे अर्धशतक करत आपल्या टीमची प्ले ऑफ घोडदौड कायम ठेवली.

या सीझनमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने सलग पाचवा विजय नोंदविला. आयपीएलच्या इतिहासात त्याने दुसऱ्यांदा सलग 5 सामने जिंकले. पंजाबने 2014 मध्ये देखील युएईमध्ये सलग 5 सामने जिंकले गेले.