आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोंमध्ये पाहा IPLचा रोमांच:बंगळुरूच्या सिराजने पाडला विकेट्सचा पाऊस, एका सामन्यात 2 मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज ठरला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सीझनमधील 39 वा सामना पूर्णपणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावर राहिला. सामन्यात कर्णधार विराटने वेगवाग गोलंदाज मोहम्मद सिराजला अचानक दुसरी ओव्हर दिली. यानंतर सिराज मेडन ओव्हरसोबतच 2 गडी बाद केले आणि KKR च्या अडचणी वाढवल्या.

यानंतर KKR शेवटपर्यंत या सुरुवातीच्या झटक्यांपासून सावरू शकली नाही. केकेआरच्या सलग विकेट पडत गेल्या. KKR ने 8 गडी गमावत 20 षटकांत फक्त 84 धावा केल्या. हा या सीझनमधील सर्वात कमी स्कोअर आहे. या दरम्यान सिराज एका सामन्यात दोन मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज बनला. सिराजने 4 षटकांत 8 धावा देत 3 गडी बाद केले. त्याने राहुल त्रिपाठी, नीतीश राणा आणि टॉम बेंटनला बाद केले.

IPL मध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाने 20 षटकांत फलंदाजी करत सर्वाधिक छोटा 84 धावांचा स्कोअर केला आहे. याआधी 2009 मध्ये साउथ आफ्रिकेच्या डरबनमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 20 षटकांत 8 गडी बाद 92 धावांचा स्कोअर केला होता.

KKRने मोसमातील 85 धावांचे सर्वात लहान लक्ष्य दिले. RCBने 2 गड्यांच्या मोबदल्यात 13.3 षटकांत सामना जिंकला. कर्णधार कोहलीने नाबाद 18 धावा केल्या.

RCB चा वेगवाग गोलंदाज मोहम्मद सिराज एका सामन्यात दोन मेडन टाकणारा पहिला बॉलर ठरला. त्याने 4 षटकांत 8 धावा देत 3 गडी बाद केले.

RCBच्या गुरकीरत सिंगने 26 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला.

KKR संघाकडून लोकी फर्ग्युसनने एकमेव विकेट घेतली. फलंदाजीत संघाला जास्त धावा करता आले नाही परंतु फर्ग्युसनचा शानदार फॉर्म या सामन्यात कायम राहिला.

RCB साठी क्रिस मॉरिसने KKR च्या कुलदीप यादवला धावबाद केले.

सीमारेषेवर उंच उडी घेत षटकार रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना गुरकीरत सिंह

षटकार रोखण्याचा प्रयत्न करताना गुरकीरत सिंह बराच वेळ हवेत होता.

RCB च्या युजवेंद्र चहलने सामन्यात 4 षटकांत 15 धावा देत 2 गडी बाद केले.

नाणेफेक दरम्यान RCBचा कर्णधार विराट कोहली आणि KKRचा कर्णधार इऑन मॉर्गन अशा अंदाजात दिसले.

बातम्या आणखी आहेत...