आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पहा IPL चा रोमांच:कोहली आणि डिव्हिलियर्सने 47 चेंडूत केली 100 धावांची भागीदारी; कोलकातासाठी भाग्यवान ठरला नाही शाहरुख खान

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे फलंदाज एबी डिव्हिलियर्सने 6 षटकार आणि 5 चौकारांसह सामना रोमांचित केला. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत 633 चेंडूत 73 धावा केल्या. डिव्हिलियर्सने कर्णधार विराट कोहलीसोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 100 धावांची नाबाद भागीदारी केली. या सामन्यात बंगळुरूने कोलकाताचा 82 धावांनी पराभव केला.

केकेआरचा मालक शाहरुख खान देखील हा सामना पाहण्यासाठी पोहोचला होता. मात्र यावेळी तो संघासाठी भाग्यवान ठरला नाही. मागील दोन सामन्यात शाहरुखच्या उपस्थितीत संघाने विजय मिळवला होता.

एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यात तिसर्‍या विकेटसाठी 47 चेंडूत 100 धावांची नाबाद भागीदारी झाली. डिव्हिलियर्सने 73 आणि कोहलीने 33 धावा केल्या.

सामना जिंकल्यानंतर डिव्हिलियर्स आणि कोहली अशाप्रकारे सोबत दिसले. दोघांनी मिळून आयपीएलमध्ये 3000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

बंगळुरूच्या देवदत्त पडिकक्कलने मोठी झेप घेऊन षटकार रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणी त्याच्या पायाचा सीमारेषेला स्पर्श झाला.

कोलकाताच्या प्रसिद्ध कृष्णाने बेंगळुरूचा सलामीवीर आरोन फिंचला क्लीन बोल्ड केले.

फिंच 37 चेंडूत 37 धावा काढून बाद झाला. यादरम्यान त्याने एक षटकार आणि 4 चौकार लगावले.

बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडिकक्कलला आंद्रे रसेलने क्लीन बोल्ड केले. त्याने 23 चेंडूत 32 धावा केल्या.

कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक 2 चेंडूंत 1 धाव काढून बाद झाला. युजवेंद्र चहलने त्याला क्लीन बोल्ड केले.

कोलकाताचा नितीश राणा देखील वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. त्याने 14 चेंडूत 9 धावा केल्या.

कोलकाताचा सलामीवीर शुभमन गिल 34 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. ईसूरु उदानाच्या थ्रोवर विकेटकीपर एबी डिव्हिलियर्सने त्याला धावबाद केले.

कोलकाताचा सलामीवीर टॉम बेंटनला नवदीप सैनीने क्लीन बोल्ड केले. बेंटनचा आयपीएलमध्ये डेब्यू सामना होता. त्याने 12 चेंडूत 8 धावा केल्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला सामन्याबाहेर ठेवण्यात आले. या मोसमात त्याने फक्त 2 सामने खेळले आहेत आणि फक्त एक विकेट घेतली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser