आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलमध्ये सोमवारपर्यंत १० सामने खेळवण्यात आले आहेत. कमी सामन्यांतही अनेक विक्रम बनले. ४ सामन्यांत २०० पेक्षा अधिक धावा निघाल्या. यात टी-२० चे दोन उत्कृष्ट खेळाडू सपशेल अपयशी ठरले. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली पहिल्या तीन सामन्यांत केवळ १८ धावा करू शकला. बंगळुरूचा कर्णधार कोहलीची या लीगच्या इतिहासातील पहिल्या तीन सामन्यांतील सर्वात खराब कामगिरी ठरली. मुंबईचा वेगवान गोलंदाज बुमराह १० च्या सरासरीने धावा देत आहे.
विराट कोहली अद्याप एकही चौकार मारू शकला नाही
यंदाच्या सत्रात कोहलीने २९ चेंडू खेळले आणि आतापर्यंत एकही चौकार मारू शकला नाही. त्याचबरोबर पंजाब विरुद्ध सामन्यात केएल राहुलचे दोन सोपे झेल सोडले. त्यामुळे राहुलने शतक झळकावले आणि बंगळुरूचा ९७ धावांनी पराभव झाला. कोहली ५४३० धावांसह लीगमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
जसप्रीत बुमराह च्या चेंडूंवर आतापर्यंत उत्तुंग ९ षटकार
बुमराह पहिल्या तीन सामन्यात ९.७५ च्या म्हणजे १० च्या सरासरीने धावा देत आहे. त्याने ७३ चेंडूंत ९ षटकार दिले. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने देखील ७२ चेंडूंत ९ षटकार दिले. सोमवारी बंगळुरू विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. लीगमध्ये पहिल्यांदा असे घडले की, बुमराहने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आणि संघ जिंकू शकला नाही.
बुमराहची गेल्या दोन सत्रांत ७ पेक्षा कमी सरासरी राहिली
बुमराहने गेल्या दोन सत्रात ७ पेक्षा कमी सरासरीने धावा दिल्या होत्या. त्याने गेल्या सत्रात ३७० चेंडूत ४०९ धावा दिल्या, १९ बळी घेतले होते. त्याची सरासरी ६.६३ राहिली. यंदाच्या सत्रात बुमराहने १२ षटकांत ९.७५ च्या सरासरीने ११७ धावा दिल्या आहेत आणि ३९ च्या सरासरीने ३ बळी घेतले. मुंबईच्या सर्व गोलंदाजांची सरासरी पहिल्या तीन सामन्यात ७.५० पेक्षा पुढे आहे.
सॅमसन व ईशान किशनच्या कामगिरीमुळे पंतवर दबाव
धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर आता यष्टिरक्षकाची शोधमोहीम सुरू आहे. पंतची कामगिरी चांगली नसल्याने राहुलकडे ही जबाबदारी देण्यात आली. आता संजू सॅमसन आणि ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थाच्या सॅमसनने पहिल्या दोन सामन्यात १५९ धावा काढल्या. त्याचा स्ट्राइक रेट २१५ चा राहिला. त्याने ५ चौकार व १६ षटकार खेचले. दोन्ही सामन्यात तो सामनावीर ठरला. मुंबईच्या ईशानला सुरुवातीच्या दोन सामन्यांत संधी मिळाली नव्हती. बंगळुरू संंघाविरुद्ध त्याने ९९ धावांच्या खेळीतून विजयाचा मार्ग सुकर केला हाेता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.