आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:ख्रिस गेल आणि राहुलला अखेरच्या षटकात 2 धावांसाठी करावा लागला संघर्ष, थरारक विजयानंतर खूष झाली प्रीती झिंटा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकिन प्रिती झिंटा आनंदी दिसत होती. मात्र ख्रिस गेल आणि कर्णधार लोकेश राहुल यांना शेवटच्या षटकात 2 धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. - Divya Marathi
आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकिन प्रिती झिंटा आनंदी दिसत होती. मात्र ख्रिस गेल आणि कर्णधार लोकेश राहुल यांना शेवटच्या षटकात 2 धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला.

आयपीएल सीझन-13 च्या 31 व्या सामन्यात किंग्स इलेव्ह पंजाबने रॉयल चॅरेंजर्स बंगळुरूवर 8 विकेट्सनी रोमहर्षक विजय मिळवला. शारजाह येथील सामन्यात आरसीबीने पंजाबला 172 धावांचा आव्हान दिले होते. क्रिस गेल (53) आणि लोकेश राहुल (61)ने 19 व्या षटकापर्यंत टिकून सामन्यातील विजय सोपा केला.

दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली, मात्र अखेरच्या षटका दोघांना केवळ 2 धावांसाठी घाम फुटला. ही ओव्हर फिरकीपटू युजवेंद्र चहलने टाकली होती. या सीझनमध्ये 5 पराभवानंतर पंजाबचा हा दुसरा विजय आहे.

प्रदीर्घानंतर किंग्ज इलेव्हनच्या फ्रँचायझीची मालकिन प्रीती झिंटाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. षटकातील शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी जेव्हा 1 धावाची आवश्यकता होती तेव्हा प्रीतीच्या चेहऱ्यावर टेंशन स्पष्ट दिसत होते परंतु निकोलस पुरनने षटकार ठोकताच ती आनंदाने फुलली.

शेवटच्या षटकातील सुरुवातीचे 2 बॉल डॉट खेळल्यानंतर ख्रिस गेल 5 व्या चेंडूवर धावबाद झाला.

पंजाबला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची गरज होती, पण तरीही अखेरच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. गेल 52 धावांवर स्ट्राइकवर आणि राहुल 61 धावांवर नॉन स्ट्राइकवर होता. चेंडू चहलच्या हाती होता. त्याने गेलला पहिल्या दोन चेंडूत एकही धाव दिली नाही.

तिसऱ्या चेंडूवर गेल एक धावा घेण्यास यशस्वी ठरला. चौथा चेंडू राहुल डॉट खेळला आणि दोन्ही फलंदाज दबावात आले. 5 व्या चेंडूवर राहुलले एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र गेल धावबाद झाला.

पंजाबला एका चेंडूवर एक धाव आवश्यक होती. निकोलस पुरनने षटकार मारत पंजाबला सीझनमधील दुसरा विजय मिळवून दिला.

पूरनच्या षटकारानंतर आणि सामना जिंकल्यानंतर पंजाबचा कर्णधार राहुल अशाच प्रकारे गुडघ्यावर टेकत सुटकेसा निःश्वास सोडला.

सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने 49 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने 5 षटकार आणि एक चौकार ठोकला.

सीझनमधील पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलने 45 चेंडूत 53 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 षटकार आणि एक चौकार ठोकला.

विराट कोहलीचा हा आरसीबीसाठी 200 वा सामना होता. त्याने संघासाठी आयपीएलमध्ये 185 आणि चॅम्पियन्स लीगमध्ये 15 टी-20 सामने खेळले आहेत. सामन्यात कोहलीने 39 चेंडूत 48 धावा केल्या.

एबी डिव्हिलियर्स 2 धावांवर बाद झाला. त्याच षटकात मोहम्मद शमीने विराट कोहलीला देखी बाद केले. IPL मध्ये 8 व्यांदा कोहली-डिव्हलियर्स एका षटकात बाद झाले. दोघांना पहिल्यांदा 2012 मध्ये जॅक कॅलिसने पव्हेलियनमध्ये पाठविले होते.

आरसीबीचा सलामीवीर आरोन फिंचला पंजाबच्या मुरुगन अश्विनने क्लीन बोल्ड केले. त्याने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 चेंडूत 20 धावा केल्या.

विराट कोहलीचा शानदार झेल घेताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि यष्टीरक्षक लोकेश राहुल.

पंजाबचा फिरकीपटू मुरुगन अश्विनने 4 षटकांत 23 धावा देऊन 2 गडी बाद केले.

शेवटच्या षटकात सामना हातातून जाताना पाहून टेंशनमध्ये होती किंग्ज इलेव्हन पंजाबची प्रीती झिंटा

पूरनने षटकार खेचत सामना जिंकल्यानंतर प्रीती झिंटाच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसून आली.

सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली फुटबॉल खेळताना दिसला.

बातम्या आणखी आहेत...