आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPL चा रोमांच:पंजाबने 13 चेंडूत 6 विकेट घेत हैदराबादकडून विजय हिसकावला, पराभवाच्या भीतीने दु:खी प्रिती झिंटा आनंदून गेली

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 43 वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यात रोमांचक ठरला. पंजाबने प्रथम फलंदाजी करत 127 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात हैदराबादने 17 षटकांत 4 गडी बाद 107 धावा केल्या होत्या. येथे पंजाबचा पराभव स्पष्टपणे दिसत होता. यामुळे प्रिती झिंटा दुःखी दिसली.

यानंतर 18 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर विजय शंकर 26 धावांवर बाद झाला. हैदराबादला अखेरच्या 13 चेंडूत 17 धावांची आवश्यकता होती. तेवढ्यात पंजाबच्या क्रिस जॉर्डन आणि अर्शदीप सिंहने 2-2 गडी बाद करून सामना पलटवला. अखेर खलील अहमद धावबाद झाला आणि पंजाबने 12 धावांनी सामना आपल्या खिशात घातला. यानंतर व्हीआयपी स्टँडमध्ये दु: खी दिसणारी प्रीती आनंदीत दिसली.

पंजाबकडून निकोलस पुराणने सर्वाधिक नाबाद 32 धावा केल्या. त्यामुळे संघाने 7 विकेट्सवर 126 धावा केल्या.

पंजाबकडून ख्रिस गेलने 20 चेंडूंत 20 धावा फटकावल्या.

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलला रशीद खानने क्लीन बोल्ड केले. राहुलने 27 धावांची खेळी केली.

हैदराबादच्या राशिद खानने मनदीप सिंगचा शानदार झेल टिपला. मनदीपने 17 धावा फटकावल्या, तर 4 षटकांत रशीदने 14 धावा देऊन 2 बळी घेतले.

पंजाबचा संघ काळी पट्टी बांधून सामन्यात उतरली होती. कारण शुक्रवारी मनदीप सिंहचे वडील हरदेव सिंह यांचे निधन झाले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंजाबच्या खेळाडूंनी काळी पट्टी बांधली होती.

सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 35 आणि जॉनी बेअरस्टोने 19 धावा केल्या.

जगदीशा सुचितने मनीष पांडेचा शानदार झेल पकडला. मनीषने 29 चेंडूत 15 धावा केल्या.

पंजाबच्या रवी बिश्नोईने 13 धावा देत एक गडी बाद केला. त्याने डेव्हिड वॉर्नरला बाद केले.

18 व्या षटकातील चौथ्या बॉलवर स्ट्राइकवर असलेला जेसन होल्डर शॉट मारून धावला. दरम्यान निकोलस पूरनने स्टंपवर जोरदार थ्रो मारला.

हा चेंडू धाव घेत असलेल्या विजय शंकरच्या हेल्मेटला लागला. हेल्मेटमुळे विजय शंकर थोडक्यात बचावला.

हैदराबादच्या डावादरम्यान 17 व्या षटकापर्यंत पंजाबचा पराभव दिसत होता. तेव्हा संघाची मालकीन प्रिती दुःखी दिसली.

पंजाबच्या क्रिस जॉर्डन आणि अर्शदीप सिंगने शेवटच्या 3 षटकांत 2-2 गडी बाद करत सामना फिरवला.

बातम्या आणखी आहेत...