आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विश्लेषण:मुंबई-बंगळुरूच्या 3-3 फलंदाजांनी 400+ धावा केल्या, हैदराबादच्या एका फलंदाजाने अशी कामगिरी केली; 4 गोलंदाजांनी 10+ बळी घेतले

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांचे विश्लेषण, प्ले ऑफमध्ये सर्वाधिक 5 वेळा मुंबई विजयी

आयपीएल-१३ च्या प्ले ऑफमध्ये पोहोचणाऱ्या ४ संघांचा निर्णय झाला. या संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सर्वाधिक ३-३ फलंदाजांनी ४००+ धावा काढल्या. हैदराबादकडून केवळ एकच फलंदाजी ४०० चा टप्पा गाठू शकला. दुसरीकडे, गोलंदाजीमध्ये मुंबई व हैदराबादच्या ४-४ गोलंदाजांनी १०+ बळी घेतले. बंगळुरूच्या केवळ दोन जणांनी अशी कामगिरी केली आहे.

रबाडा व बोल्टचे २०+ बळी, ८ पेक्षा अधिक इकॉनॉमीने धावा दिल्या

दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा २५ बळी घेत अव्वलस्थानी आहे. मात्र, त्याने ८.१४ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्डने २० गडी टिपले. त्याची इकॉनॉमी ८.१४ राहिली. दुसरीकडे, हैदराबादचा लेग स्पिनर राशिद खानने १९ बळी घेतले अाणि केवळ ५.२८ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. त्याचप्रमाणे, मुंबईच्या गोलंदाजांनी २ वेळा ४+ बळी घेण्याची कामगिरी साधली.

धवनने ५ वेळा ५०+ धावा काढल्या; तीन वेळा शून्यावर बाद झाला

दिल्लीचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन यंदाच्या सत्रात दोन शतके झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. त्याने संघाकडून सर्वाधिक ५२५ धावा काढल्या. मात्र, तो तीन वेळा शून्यावर देखील बाद झाला. अशा प्रकारच्या सातत्य नसलेल्या कामगिरीमुळे दिल्ली सलग ४ सामन्यांत पराभूत झाली. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ४ अर्धशतकांसह ५२९ धावा केल्या व सर्वाधिक धावा करण्यात तो दुसऱ्या स्थानी आहे.