आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL 2020 : Latest Photos Match 33 Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore And CSK Vs DC Facts And Records With Photo Gallery

फोटोंमध्ये पहा IPLचा रोमांच:चहलसाठी लकी चार्म ठरली होणारी पत्नी धनश्री; दिल्लीच्या अक्षरने अखेरच्या षटकात 3 षटकार ठोकत चेन्नईकडून विजय हिसकावला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या युजवेंद्र चहलची होणार पत्नी धनश्री वर्मा सामना पाहण्यासाठी आली. चहलने सामन्यात 2 गडी बाद केले. - Divya Marathi
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या युजवेंद्र चहलची होणार पत्नी धनश्री वर्मा सामना पाहण्यासाठी आली. चहलने सामन्यात 2 गडी बाद केले.

आयपीएलच्या 5 व्या डबर हेडरच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात युजवेंद्र चहलसाठी त्याची होणारी पत्नी धनश्री वर्षी लकी चार्म ठरली. चहलने 2 चेंडूवर सलग 2 गडी बाद केले. या सामन्यात एकूण 15 षटकार लागले, त्यापैकी एकट्या एबी डिव्हिलियर्सने 6 षटकार ठोकले. एबी डिव्हिलियर्सने डावाच्या 19 व्या षटकात सलग 3 षटकारांसह 25 धावा केल्या.

दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सनी पराभव केला. हा सामना थरारक होता. कधी दिल्ली तर कधी चेन्नईच्या पारड्यात सामना जाताना दिसला. चेन्नईने दिल्लीला 180 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीला अखेरच्या षटकात विजयसाठी 17 धावांची गरज होती. येथे चेन्नईचे पारड जड वाटत होते, मात्र अक्षर पटेलने 3 षटकार ठोकत सामना पलटविला.

अखेर पटेलने अखेरच्या षटकात 4 बॉल खेळून 3 षटकार लगावत दिल्लीला विजय मिळवून दिला. चेन्नईसाठी अष्टपैलू रवींद्र जडेजाने ही ओव्हर केली होती.

दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने 58 चेंडूत 101 धावांची खेळी केली.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस धावा घेताना दिल्लीचा गोलंदाज कॅगिसो रबाडाला धडकला.

या सामन्यात धवनने फाफ डु प्लेसिसचा शानदार झेल घेतला. इन-फॉर्म डु प्लेसिस 58 धावांवर बाद झाला.

सामना गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दिल्ली कॅपिटलचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि सहायक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांच्याशी बोलताना.

राजस्थान रॉयल्सच्या बेन स्टोक्सने 15 धावांची खेळी केली.

जोस बटलरच्या जागी सलामीला आलेल्या रॉबिन उथप्पाने 22 चेंडूत 41 धावा केल्या. त्याने राजस्थानला पहिल्यांदाच हंगामात 50 धावांची सलामीची भागीदारी दिली.

राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने संघाला 170 पार नेले. स्मिथने 36 चेंडूत 57 धावा केल्या.

बंगळुरूच्या क्रिस मॉरिसने आयपीएलमधील दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने 4 षटकांत 26 धावा देऊन 4 बळी घेतले. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 23/4 आहे.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली क्षेत्ररक्षणात पारंगत दिसला.

अ‍ॅरॉन फिंचने उथप्पाला बाऊंड्री लाइनवर झेलबाद केले.

राजस्थानच्या जयदेव उनादकटच्या एका षटकात डिव्हिलियर्स आणि गुरकीरत सिंगने 25 धावा खेचल्या.

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या खेळीत 6 षटकार ठोकले. संघाला विजय मिळवून दिल्यानंतर काही असा दिसला मिस्टर 360

सामन्यानंतर डिव्हिलियर्स स्टीव्ह स्मिथशी हस्तांदोलन करताना.

सामना पाहण्यासाठी आलेल्या धनश्रीने विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर पार्थिव पटेलसोबत सेल्फी काढला. तिने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...