आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये झालेल्या सामन्यात रोहित शर्माची टीम पूर्णपणे प्रभावी राहिली. कोलकाताचा कर्णधार इयान माॅर्गन आणि पॅट कमिन्स यांच्याशिवाय एकही फलंदाज यशस्वी खेळी करू शकला नाही. जसप्रीत बुमराहच्या बाउन्सरवर आंद्रे रसेलही जास्त काळ टिकू शकला नाही आणि बाद होऊन तंबूत परतला.
सामन्यापूर्वी कर्णधारपद सोडणार दिनेश कार्तिक या सामन्यातही फेल झाला. ताे अवघ्या ४ धावांची खेळी करू शकला. तेही त्याने एक चाैकार मारला. आता त्याच्या जागी इयान माॅर्गनकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली आहे. मॅच पाहण्यासाठी केकेआरचा मालक शाहरुख खान मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानासोबत मैदानात उपस्थित होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.