आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 18 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा 10 विकेट्सनी दारुण पराभव केला. या सत्रात पहिल्यांदाच एखादा संघ दुबई धावांचा पाठलाग करताना जिंकला आहे. याआधी या मैदानावर 7 सामने झाले. हे सर्व सामने प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला होता. आजच्या सामन्यात चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन (83) आणि फाफ डु प्लेसिस (87) यांनी नाबाद 181 भागीदारी केली. चेन्नईकडून पहिल्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी आहे.
स्कोअर बोर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यापूर्वी चेन्नईसाठी माइक हसी आणि मुरली विजयने 2011 मध्ये बंगळुरू विरुद्ध 159 धावांचा सलामीची भागीदारी केली होती. तर आयपीएलमध्ये डु प्लेसिसने 15 वे आणि वॉटसनने 20 वे अर्धशतक झळकाविले.
या सत्रात चेन्नईचा दुसरा विजय
आयपीएल 2020 मध्ये चेन्नई आतापर्यंत 5 सामने खेळली आहे. चेन्नईने सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. यानंतर चेन्नईला सलग 3 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. या दुसऱ्या विजयासोबत चेन्नईचे आता 4 गुण झाले आहेत.
प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 4 गडी गमावून 178 धावा केल्या. कर्णधार लोकेश राहुलने 52 चेंडूत सर्वाधिक 63 धावा आणि निकोलस पूरनने 17 चेंडूत 33 धावा केल्या. मयंक आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. राहुल आणि पूरन व्यतिरिक्त मनदीप सिंहने 16 चेंडूत 27 आणि मयंक अग्रवालने 19 चेंडूत 26 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर चेन्नईसाठी शार्दुल ठाकुरने 2 गडी बाद केले तर रविंद्र जडेजा आणि पीयूष चावलाला 1-1 विकेट मिळाली. शार्दुलने सलग 2 चेंडूत राहुल आणि पूरनला बाद केले.
दोन्ही संघांसाठी आवश्यक होता हा सामना
दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता. कारण दोन्ही संघांचा या सत्रात 4 पैकी 3-3 सामन्यांत पराभव झाला आहे. अशात आणखी एका पराभवामुळे अडचणी वाढली असती.
दोन्ही संघ
चेन्नई सुपर किंग्स : शेन वॉटसन, अंबाती रायडू, फाफ डु प्लेसिस, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, सॅम करन, शार्दुल ठाकुर, पीयूष चावला आणि दीपक चाहर
किंग्स इलेव्हन पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मयंक अग्रवाल, मनदीप सिंह, निकोलस पूरन, ग्लेन मैक्सवेल, सरफराज खान, क्रिस जॉर्डन, हरप्रीत बरार, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉटरेल
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.