आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:हैदराबादकडे प्ले ऑफ प्रवेशाची संधी; फायनलच्या तयारीसाठी मुंबई मैदानावर

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डेव्हिड वाॅर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडे आता यंदा १३ व्या सत्राच्या आयपीएलमधील बाद फेरी गाठण्याची संधी आहे. हैदराबाद लीगचा आपला शेवटचा सामना आज मंगळवारी खेळणार आहे. हैदराबादसमाेर या सामन्यात गतचॅम्पियन आणि अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचे तगडे आव्हान असेल. या सामन्यातील विजयाने हैदराबादला प्ले ऑफमधील आपला प्रवेश निश्चित करता येईल. मात्र, हैदराबाद संघासाठी ही वाट अधिक खडतर आहे. कारण सलगच्या विजयाने मुंबई इंडियन्स संघ फाॅर्मात आहे. त्यामुळे आपली विजयी माेहीम कायम ठेवण्याच्या इराद्याने मुंबईचा संघ मैदानावर उतरणार आहे. चेन्नईच्या शेवटच्या सामन्यातील विजयाने मुंबईचा प्ले ऑफ प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे मुंबई संघासाठी आजचा सामना हा बाद फेरीतील लढतीसाठीच्या तयारीसाठीची मॅचसारखा आहे. मात्र, या सामन्यातही उल्लेखनीय खेळी करून लीगमधील आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी मुंबईचे खेळाडू उत्सुक आहेत. त्यामुळे विजयाने लीगच्या शेवटच्या सामन्याची सांगता करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. या सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जाते.

आेव्हरआॅल लढत अटीतटीची
आतापर्यंत दाेन्ही संघांमध्ये एकूण १५ सामने झाले आहेत. यातील आठ सामन्यांत मुंबई इंडियन्सला विजयी पताका फडकावता आली, तर सात सामन्यांत हैदराबादने बाजी मारली. त्यामुळे आता यामध्ये बराेबरी साधण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल. यंदा याच मैदानावर हे दाेन्ही संघ झंुजले हाेते. यात मुंबईचा संघ ३४ धावांनी विजेता ठरला हाेता.

वाॅर्नर, साहावर मदार :
हैदराबाद संघाच्या विजयाची मदार कर्णधार डेव्हिड वाॅर्नर आणि यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहावर आहे. हे दाेघेही सध्या फाॅर्मात आहेत. त्यामुळे या दाेघांकडून टीमला माेठ्या खेळीची आशा आहे. यापाठाेपाठ विलियम्सन आणि जेसन हाेल्डरमुळेही टीम मजबूत झाली आहे. विलियम्सन सध्या मधल्या फळीत सरस खेळी करताना दिसत आहे. त्यामुळे टीमला त्याच्याकडूनही माेठी आशा आहे. गाेलंदाजीमध्ये रशिद खान आणि नटराजन विश्वास सार्थकी लावणारी खेळी करण्यात सक्षम आहे. दुसरीकडे युवा गाेलंदाज संदीप शर्माही सध्या लयीत आला आहे. त्यानेही सरस खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

10 वा विजय साजरा करण्यासाठी आता मुंबई इंडियन्स संघ मैदानावर उतरणार आहे. आतापर्यंत मंुबईने ९ विजयासह अव्वल स्थान गाठले आहे.