आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL मधून निवृत्ती घेणार नाही:आयपीएलमधून निवृत्त होण्याच्या चर्चांना महेंद्रसिंह धोनीकडून पूर्णविराम

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्त होणाच्या चर्चांणा रविवारी पूर्णविराम लावला. आज चेन्नई आणि पंजाबचा सामना होत आहे. या सामन्यापूर्वी टॉस दरम्यान कमेंटेटर डॅनी मॉरिसनने धोनीला विचारले की, हा तुझा शेवटचा सामना आहे का ? यावर धोनी म्हणाला बिलकुल नाही.

सोशल मीडियावर सुरू होत्या निवृत्तीच्या चर्चा

सीजनमध्ये सामना झाल्यानंतर धोनी विरोध संघातील अनेक खेळाडूंना ऑटोग्राफ देण्यासोबतच गिफ्ट देतानाचे फोटोज व्हायरल झाली. यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली. धोनीने 15 ऑगस्टला अचानक इंस्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. धोनीने आपला अखेरचा सामना मागच्या वर्षी वर्ल्डकपमध्ये न्यूजीलँडविरुद्ध खेळला होता.

चेन्नई पहिल्यांदा प्लेऑफमधून बाहेर

चेन्नई सुपर किंग्स पहिल्यांदा प्ले ऑफमधून बाहेर आली आहे. या सीजनमध्ये चेन्नईचा आतापर्यंत 8 सामन्यात पराभव आणि 5 सामन्यात विजय झाला आहे. गुणतालिकेत चेन्नई सर्वात काली आहे. यापूर्वी चेन्नईने तीनवेळा (2010, 2011, 2018)आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर पाचवेळेस (2008, 2012, 2013, 2015 और 2019) उप-विजेता ठरला आहे.