आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 17 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैद्राबादचा 34 धावांनी पराभव केला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला 209 धावांचे लक्ष्य दिले. मुंबईने दिलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 7 गडी बाद 174 धावांपर्यंत मजल मारू शकला. वॉर्नरने सर्वाधिक 60 धावा केल्या. मुंबईचा या सत्रातील हा तिसरा आणि हैदराबादवर ओव्हरऑल 8 वा विजय आहे. मुंबईच्या जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिंसनने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
स्कोअर बोर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शारजाहमध्ये सलग चौथ्या सामन्यात 200+ धावा
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी बाद 208 धावा केल्या. क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 67 धावा केल्या. मुंबईने अखेरच्या 5 षटकांत 61 धावा केल्या. डिकॉक व्यतिरिक्त हार्दिक पंड्याने 28, केरोन पोलार्डने नाबाद 25 आणि क्रुणाल पंड्याने नाबाद 20 धावा केल्या. हैदराबादसाठी संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौलने 2-2 गडी बाद केले. तर राशीद खानला 1 विकेट मिळाली.
मागील सामन्यात जखमी झालेल्या जलदती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागेवर संदीप शर्माला स्थान मिळाले. तर खलील अहमदच्या जागी सिद्धार्थ कौलला सामन्यात खेळण्याची संधी दिली. या दोघांनी एक-एक गडी बाद केला.
दोन्ही संघातील परदेशी खेळाडू
मुंबईच्या संघात क्विंटन डिकॉक, केरोन पोलार्ड, जेम्स पॅटिंन्सन आणि ट्रेंट बोल्ट हे तर सनराइजर्स हैद्राबाद संघात कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, केन विल्यम्सन आणि राशीद खान हे परदेशी खेळाडू आहेत.
रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा दुसरा खेळाडू
रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. आजचा त्याचा 193 वा सामना आहे. याआधी सुरेश रैना देखील लीगमध्ये 193 सामने खेळला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम एमएस धोनी (194) च्या नावावर आहे.
दोन्ही संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, केरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, जेम्स पैटिंसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट और जसप्रीत बुमराह।
सनराइजर्स हैदराबाद : डेव्डिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (यष्टिरक्षक), मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल और टी नटराजन।
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.