आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा IPLचा रोमांच:राजस्थानच्या तेवतियासोबत हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने घातला वाद; लीगमध्ये धवने 38 वे अर्धशतक झळकावले, षटकारांचे शतकही पूर्ण केले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 26 व्या सामन्यात खेळाडूंमध्ये वाद पाहण्यास मिळाला. राजस्थान रॉयल्सने सनराइजर्स हैदराबादला थरारक सामन्यात 5 विकट्सनी मात दिली. तर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव केला. दिल्लीच्या शिखर धवनने आयपीएलमध्ये 38 वे अर्धशतक झळकावत विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैनाशी बरोबरी केली. त्याने लीगमध्ये 100 षटकार पूर्ण केले.

राजस्थान रॉयल्सचा रियान परागने सामना जिंकल्यानंतर नृत्य करत विजय साजरा केला. याआधी राजस्थानचा राहुल तेवतिया आणि हैदराबादचा खलील यांच्यात वादविवाद झाला होता, जो हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला अनुकूल वाटला नव्हता. यानंतर तेवतिया, वॉर्नर आणि खलील या तिघांत वाद पाहण्यास मिळाला. पंच आणि खेळाडूंच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने 52 चेंडूत 69 धावा केल्या. एक षटकार मारत धवनने आयपीएलमध्ये आपले 100 षटकार पूर्ण केले.

रोहित शर्माने मुंबईसाठी 150 सामना खेळला. तो फक्त 5 धावाच करू शकला, मात्र त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव केला.

दिल्लीच्या पृथ्वी शॉने सीमारेषेवर मुंबईच्या ईशान किशनचा झेल पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चाहरने दिल्लीचा फलंदाज मार्कस स्टोइनिसला धावबाद केले.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने शानदार 48 धावांची खेळी केली. वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा फलंदाज आहे.

प्रियम गर्गने (15) विलियम्सनसोबत 5 व्या विकेटसाठी 36 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.

यूएईमध्ये क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर राजस्थानच्या संघात परतलेला बेन स्टोक्स 5 धावांवर बाद झाला.

हैदराबादच्या खलील अहमदने राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले.

हैदराबादच्या राशिद खानने 4 षटकांत 25 धावा देत 2 गडी बाद केले. राशीदने रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसनला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

रियान परागने नाबाद 42 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

राजस्थानला षटकारासह विजय मिळवून दिल्यानंतर रियान परागने नाचत आनंद व्यक्त केला.

राहुल तेवतियाने 45 धावा करत हैदराबादच्या हातून विजय हिसकावला.

विजयानंतर डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंनी आनंद व्यक्त केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser