आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:मुंबईची नजर नवव्यांदा प्लेऑफमधील प्रवेशावर; पराभवाने राजस्थान बाहेर

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार वर्षांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवू इच्छितो बंगळुरू

राजस्थान रॉयल्सकडे अद्यापही स्पर्धेत पुनरागमनाची संधी आहे. टीमने फलंदाजी क्रमात सतत बदल करत स्वत:ला स्पर्धेतून जवळपास बाहेर केले आहे. कोणत्याही संघाने अापल्या फलंदाजीत इतका बदल केला असेल की, फलंदाजांना आपली लय मिळू नये. त्यांच्या काही खेळाडूंनी चांगल्या खेळी केल्या, मात्र त्यामध्ये सातत्य नव्हते. गोलंदाजांची कामगिरी खराबच आहे. केवळ जोफ्रा आर्चर प्रभावी ठरला. इतर कोणताही गोलंदाज त्याला साथ देऊ शकला नाही. राजस्थानचा सामना होणार मुंबई इंडियन्ससोबत. हा असा सामना आहे, ज्यात मुंबईच जिंकण्याची शक्यता अधिक आहे. कर्णधार रोहित शर्मा जखमी आहे, मात्र इतर सर्व फलंदाज लयीत आहेत. टीमने चेन्नईविरुद्ध ते दाखवून दिले. त्यांची गोलंदाजी स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजीपैकी एक आहे, ज्यामुळे राजस्थानसाठी सामना संघर्षपूर्ण ठरेल.

चार वर्षांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवू इच्छितो बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे २०१६ नंतर पहिल्यांदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. त्यांच्यासमोर असेल संघर्ष करत असलेली चेन्नई सुपरकिंग्ज. मुंबईविरुद्ध शुक्रवारी मिळालेला पराभव चेन्नई टीमचे स्थिती सांगेल. संघात युवा ऋतुराज गायकवाड आणि जगदिशन यांना संधी मिळेल. ताहिर परतला आहे. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. चेन्नई संघाने आतापासून पुढील सत्राचा विचार सुरू केला आहे. त्यांच्याकडून केवळ एकच खेळाडू आपली छाप सोडू शकला, तो म्हणजे सॅम करेन. दुसरीकडे, बंगळुरूच्या संघात काही गोष्टी सध्या सुरळीत आहेत.