आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हैदराबादचा बंगळुरूवर 5 गडी राखून विजय:सनराइजर्स हैदराबाद सहाव्या विजयासह टॉप-4मध्ये पोहोचली, प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सत्रातील 52 व्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 विकेट्सनी पराभव केला. यासोबतच हैदराबाद गुणतालिकेत टॉप-4मध्ये पोहोचली. यामुळे हैदराबाद संघ प्ले-ऑफच्या चौथ्या संघाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. पराभवानंतरही बंगळुरू गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
सामन्याचा स्कोअर बोर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

शारजाहच्या मैदानावर बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 121 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात हैदराबादने 14.1 षटकांत 5 गडी राखून 121 धावा करत सामना खिशात घातला.

ऋद्धिमान आणि मनीषने डाव सांभाळला

बंगळुरूने दिलेल्या 121 धावांचा पाठलाग करताना सनराइजर्स सुरुवात चांगली राहिली नाही. 10 धावांवरच कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. यानंतर सलामीवीर ऋद्धिमान साहा आणि मनीष पांडे यांनी डाव सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. साहाने 39 आणि मनीषने 26 धावांची खेळी केली.

संदीप आणि होल्डरने 2-2 गडी बाद केले

बंगळुरूने 7 गडी बाद 120 धावा केल्या. जोश फिलिपने 31 चेंडूत सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. याशिवया एबी डिविलियर्सने 24 आणि वॉशिंग्टन सुंदरने 31 धावा केल्या. हैदराबादसाठी संदीप शर्मा आणि जेसन होल्डरने 2-2 गडी बाद केले. याशिवाय टी नटराजन, शाहबाज नदीम आणि राशिद खानने 1-1 विकेट घेतली.

बंगळुरूची खराब सुरुवात

RCB ची अत्यंत खराब सुरुवात झाली. 28 धावांवर 2 गडी बाद झाले होते. वेगवान गोलंदाज संदीप शर्माने दोन्ही विकेट घेतल्या. त्याने सलामीवीर देवदत्त पडिक्कल (5) आणि विराट कोहलीला (7) बाद केले. यानंतर जोश फिलिपने 32 आणि एबी डिविलियर्सने 24 धावा करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली.

फिलिपला राशिद खानने माघारी पाठवले. तर शाहबाज नदीमने डिविलियर्सला बाद केले. नटराजनने आपल्याच चेंडूवर झेल घेत वॉशिंग्टन सुंदरला पव्हेलियनचा मार्ग दाखवला.

RCB संघात दोन बदल

कर्णधार डेव्हिड वॉर्नरने संघात एक बदल केला. विजय शंकरच्या जागी अभिषेक शर्माला संधी देण्यात आली आहे. तर बंगळुरूच्या संघात दोन बदल करण्यात आले. नवदीप सैनी आणि इसुरु उडाणाचे संघात पुनरागमन झाले तर डेल स्टेन आणि शिवम दुबेला विश्रांती देण्यात आली आहे.

बंगळुरू दुसऱ्या आणि हैदराबाद 7 व्या क्रमांकावर

हैदराबादला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सामना जिंकणे आवश्यक आहे. तर बंगळुरूला प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. गुणतालिकेत बंगळुरू दुसऱ्या आणि हैदराबाद 7 व्या क्रमांकावर आहे. बंगळुरूने या सीझनमध्ये 12 पैकी 5 सामने गमावले असून 7 विजय मिळवले आहेत. त्यांचे 14 गुण आहेत. तर हैदराबाद 12 पैकी 5 सामने जिंकले असून 7 गमावले आहेत. त्यांचे 10 गुण आहेत.