आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्ली कॅपिटल्स टीम गत सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत झाली आहे. मात्र, बुधवारी वेगळे काहीही होऊ शकते. ते अद्यापही स्पर्धेतील अव्वल संघांत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात दिल्लीला सर्वस्व पणाला लावावे लागेल. या सत्रात जेव्हा दोन्ही संघांत पहिला सामना झाला, तेव्हा दिल्लीने ४६ धावांनी विजय मिळवला. मात्र, त्यानंतर खूप काही बदल झाला.
दिल्लीसाठी त्याच्या खेळाडूंची दुखापत ही मोठी अडचण आहे. ऋषभ जखमी झाला, तो एक आठवडा खेळू शकणार नाही. वेगवान गोलंदाज ईशांतही मायदेशी परतणार आहे. दुखापतीमुळे टीमला आपला क्रम सतत बदलावा लागतोय. त्यांना शिमरोन हेटमायरला बाहेर ठेवावे लागतेय. मधल्या फळीत फलंदाजीची लय बिघडत आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.