आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला नव्याने सुरुवात करावी लागेल. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर राजस्थानविरुद्ध गत सामन्यात जखमी झाला. त्याच्या दुखापतीवर फ्रँचायझीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. ऋषभ पंतदेखील दुखापतीमुळे बाहेर आहे, ज्यामुळे संघाला आपले नियोजन पूर्णपणे बदलावे लागेल. पंतच्या दुखापतीमुळे हेटमायरला संधी मिळत नाही. संघाची गोलंदाजी चांगली आहे. तुषार देशपांडेने राजस्थानविरुद्ध पाचव्या गोलंदाजाची भूमिका बजावली.
राजस्थानविरुद्ध पुन्हा फाॅर्मात येण्यासाठी बंगळुरू मैदानावर
कर्णधार विराट काेहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर शनिवारी सायंकाळी राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल. गत सामन्यातील सुमार खेळीचा माेठा फटका या टीमला बसला. विराटची टीम पंजाबकडून पराभूत होऊन आली आहे. त्यापूर्वी टीम चांगल्या लयात होती. त्यांची गोलंदाजीदेखील सुरेख ठरत हाेती. मात्र, पंजाबविरुद्ध त्यांच्याकडे गरजेपेक्षा अधिक गोलंदाजी पर्याय होते. संघाला केवळ फलंदाजीचा क्रम आणि काही त्रुटी दूर करण्याची गरज आहे. त्यांनी अॅरोन फिंचच्या जागी मोईन अलीला संधी देण्याचा विचार करायला हवा. हे संघाला विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी अधिक महत्वपुर्ण ठरेल. यातून टीमला पुन्हा एकदा फाॅर्मात येण्याची संधी आहे. याशिवाय मोहंमद सिराजचादेखील विचार होईल. त्याच्या जागी पार्थिव पटेलला संधी दिली जाऊ शकते? त्यामुळे फलंदाज वाढतील. त्यामुळे विजयासाठीच्या डावपेचादरम्यान हे नव्याने बदलाचे निर्णय बंगळुरूला तारणारे ठरतील. मात्र, याच निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काेहलीला गत सामन्यातील पराभवाने माेठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, राजस्थानला प्रत्येक विभागात काम करावे लागेल. त्यांना युवा यशस्वी जैस्वालला अंतिम ११ मध्ये स्थान देण्याची आवश्यकता आहे. रॉबिन उथप्पाने निराश केले. आता वेळ आली आहे, संघाला कर्णधार स्टीव्ह स्मिथचादेखील विचार करावा लागेल. त्याचा फाॅर्म संघासाठी अडचण ठरत आहे. राजस्थान त्याला बाहेर करत डेव्हिड मिलरला संधी देईल का? जोफ्रा आर्चरमुळे गोलंदाजी चांगली दिसतेय. त्यामुळे रोमांचक सामन्याची आपण अपेक्षा करू शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.