आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • IPL 2020 : RR Vs RCB Live Score | Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore 2020 Match 33rd Live Cricket Score And Latest Updates

बंगळुरूचा राजस्थानवर रॉयल विजय:अखेरच्या 4 षटकांत 50+ धावा काढून रॉयल चॅलेंजर्सनी सामना जिंकला, गुणतालिकेत टॉप-3मध्ये स्थान कायम; डिव्हिलियर्सने केली तुफान फटकेबाजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोहलीकडे आणखी एक विक्रम करण्याची संधी

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 33 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला 7 विकेट्सनी पराभूत केले. दुबईत खेळलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 178 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बंगळुरूने 19.4 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा करत सामना खिशात घातला. बंगळुरूने अखेरच्या 4 षटकांत 50 पेक्षा जास्त धावा करत सामना आपल्या नावावर केला. सहाव्या विजयासह बंगळुरू गुणतालिकेत टॉप-3 मध्ये कायम आहे. डिव्हिलियर्सने धडाकेबाज फटकेबाजी करत 22 चेंडूत 55 धावा केल्या.


लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

कोहली-पडिक्कलने डाव सांभाळला

सलामीवीर एरॉन फिंच (14) लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने बंगळुरूचा डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. पडिक्कल 35 आणि कोहली 43 धावा काढून बाद झाले.

राजस्थानने 6 गडी बाद 177 धावा केल्या

याआधी राजस्थानने 6 गडी बाद मोबदल्यात 177 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने आयपीएलमध्ये आपले 11 वे अर्धशतक झळकावत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. स्मिश व्यतिरिक्त रॉबिन उथप्पाने 41 धावा केल्या. राहुल तेवतिया 19 धावांवर नाबाद राहिला. बंगळुरूच्या क्रिस मॉरिसने 4 आणि युजवेंद्र चहलने 2 गडी बाद केले.

राजस्थानची सीझनमधील प्रथमच 50+ धावांची सलामीची भागीदारी

राजस्थानची सुरुवात चांगली झाली. जोस बटलरच्या जागी सलामीला आलेल्या रॉबिन उथप्पाने बेन स्टोक्ससोबत मिळून 50 धावांची सलामीची भागीदारी केली. स्टोक्स 15 धावा काढून क्रिस मॉरिसच्या चेंडूवर बाद झाला. याआधी सीझनमध्ये राजस्थानसाठी दिल्ली विरुद्ध 37 धावांची सलामीची भागीदारी झाली होती.

चांगली सुरुवात झाल्यानंतर डाव गडगडला

उथप्पा आणि स्टोक्सने डावासाठी चांगला पाया रचला, पण संघ त्याचा फायदा घेऊ शकला नाही. स्टोक्सनंतर रॉबिन उथप्पाने 41 धावा केल्या आणि युजवेंद्र चहलच्या चेंडूवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर चहलने संजू सॅमसनला ()) पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला.

स्मिथ-बटलरने डाव सांभाळला

पहिल्या 10 षटकात तीन गडी गमावल्यानंतर स्मिथ आणि बटलर यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. मॉरिसने बटलरला (24) बाद करून ही भागीदारी मोडली.

राजस्थान संघात कोणताही बदल नाही, बंगळुरूमध्ये 2 बदल

राजस्थान रॉयल्सच्या संघात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. तर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने संघात 2 बदल केले आहेत. शिवम दुबे आणि मोहम्मद सिराजच्या जागी गुरकीरत सिंह मान आणि शाहबाज अहमदला संधी दिली आहे.

दोन्ही संघ

राजस्थान : बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनादकट आणि कार्तिक त्यागी.

बंगळुरू : एरॉन फिंच, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस मॉरिस, शाहबाज अहमद, इसुरु उडाना, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल.

बातम्या आणखी आहेत...