आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये आज:पंजाबपुढे बलाढ्य मुंबईला रोखण्याचे मोठे आव्हान, अडचणीतील कोलकाता व हैदराबाद आज समाेरासमाेर

दुबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सला रोखणे कठीण आहे. दुसरीकडे, पंजाब त्या सामन्यात पराभूत होतोय, ज्यात त्याचा विजय निश्चित वाटताेय. त्यांनी बंगळुरूला गत सामन्यात हरवले, तेही सोपा विजय कठीण करत. गेल अंतिम ११ मध्ये परतला आहे. मात्र, मॅक्सवेल संघासाठी चिंतेचा विषय कायम आहे.

कर्णधार राहुल व मयंक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत तरीदेखील त्यांची टीम संघर्ष करतेय. त्याचे मुख्य कारण गोलंदाजी आहे. शमी आणि बिश्नोई वगळता इतर गोलंदाज अपयशी ठरले. दुसरीकडे, मुंबईकडे चॅम्पियन बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. यात मुख्य म्हणजे, वेगवान गोलंदाज बोल्ट व बुमराह. चाहर व कृणालदेखील धावा रोखण्याबरोबर विकेट काढताहेत. संघातील सर्व फलंदाज शानदार लयीत आहेत. रोहित-डिकॉक वेगाने सुरुवात करून देताहेत. त्यांच्याकडे स्पर्धेतील सर्वात धोकादायक मधली फळी आहे. मुंबईसाठी सामना सोपा वाटतोय. मात्र, राहुलची टीम त्यांना रोखण्यासाठी काय करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

अडचणीतील कोलकाता व हैदराबाद आज समाेरासमाेर
अबुधाबीमध्ये हैदराबाद व कोलकाताकडे लय मिळवण्याची संधी आहे. दोन्ही संघांसमोर अडचणींचा डोंगर आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी लवकरात लवकर त्यांना चांगले प्रदर्शन करावे लागेल. हैदराबादला तर माहितीच नाही, चार विदेशी खेळाडूंचे करायचे काय? राशिद, वॉर्नर, बेअरस्टो व विल्यम्सन बॅटने धावा केल्या. मात्र, विल्यम्सनच्या कामगिरीत सातत्य नाही. नबी, अॅलन आणि होल्डर संधीची वाट पाहताहेत. मधल्या फळीत अनेक युवा भारतीय फलंदाज आहेत, मात्र सलग चांगली कामगिरी ते करू शकत नाहीत. कर्णधार बदलल्याने कोलकाता टीमची मोठी अडचण मॉर्गन, कार्तिक व रसेलच्या फलंदाजीचा क्रम आहे.

बातम्या आणखी आहेत...