आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:काेहलीच्या बंगळुरूसमाेर आज हैदराबादचे तगडे आव्हान

दुबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हैदराबादचे सलग 3 विजय; प्रक्षेपण संध्या. 7.30 वा

सलगच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला सनरायझर्स हैदराबाद संघ आता चाैथा सामना जिंकण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे सलगच्या चार पराभवाने अडचणीत सापडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमाेर आज हैदराबादचे तगडे आव्हान असेल.

हैदराबादने गत तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. दुसरीकडे, बंगळुरूला सलग चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. त्यांना दुसऱ्या संघांनी खराब कामगिरी केल्यामुळे प्ले ऑफमध्ये संधी मिळाली. साहा आघाडीला फलंदाजीला आल्याने हैदराबाद मजबूत झाला. मार्शच्या जागी संघात आलेल्या होल्डरने फलंदाजी व गोलंदाजी दोन्हींत आपले महत्त्व अधोरेखित केले. मुंबई-बंगळुरूला माेठी पंसती रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स बार्कच्या रेटिंग यादीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी आहे.

ब्रॉडकास्टिंग ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बार्क) अहवालानुसार, गत आठवड्यात मुंबई व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना सर्वाधिक पाहिला गेलेला कार्यक्रम ठरला. बार्कने २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान आयोजित टीव्ही कार्यक्रमावरील व्यूअरशिपचा अहवाल जाहीर केला. २८ ऑक्टोबर रोजी मुंबई-बंगळुरूचा सामना टीव्हीवर पाहिला जाणारा अव्वल कार्यक्रम ठरला. या सामन्यातील आठवड्यातील इम्प्रेशन २१,२०६ राहिले. गत काही आठवड्यापासून सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या अव्वल पाच कार्यक्रमात आयपीएलचा दबदबा राहिला.