आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl 2020
  • IPL 2020 Updates : IPL 13th Season Starts From Tomorrow 8 Teams To Fight, 60 Matches In 3 Grounds Of UAE; First Match Between Chennai Super Kings And Mumbai Indians

आजपासून 53 दिवस आयपीएल फीव्हर:8 संघ झुंजणार, यूएईच्या 3 मैदानांत 60 सामने; चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्समध्ये पहिला सामना

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा 10 डबल हेडर (एका दिवसात 2 सामने) होतील, विराट, बुमराह व गेल रचू शकतात नवे विक्रम

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग ‘आयपीएल’ शनिवारपासून सुरू होत आहे. यूएईत दुसऱ्यांदा होत असलेल्या स्पर्धेत ८ संघ झुंजतील. यंदाची आयपीएल ही यापूर्वी स्पर्धा जेथे संपली होती, तेथून सुरू होईल. म्हणजे पहिली लढत गतविजेती मुंबई इंडियन्स व उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात अबुधाबीत संध्या. ७:३० वाजता सुरू होईल.

स्पर्धेची रणधुमाळी ५३ दिवस चालेल. ३ स्टेडियममध्ये ६० सामने होतील. विजेतेपदाची लढत १० नाेव्हेंबरला आहे. यंदा १० डबल हेडर (एका दिवसात २ सामने) होतील. दुबईत २४, अबुधाबीत २० व शारजात १२ सामने होतील. कोरोनामुळे यंदा बक्षिसाची रक्कम निम्मी केली आहे. विजेत्या संघास यंदा २० कोटींऐवजी १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल.

यंदाची आयपीएल वेगळी

> मैदानात पहिल्यांदाच प्रेक्षक आणि चिअर लीडर्स नसतील.

> प्रथमच फ्रंट फूट नो-बॉल फील्ड अंपायरऐवजी थर्ड अंपायर देईल.

> प्रथमच कन्कशन नियम लागू असेल. डोक्यावर चेंडू लागून जखमी झालेल्या खेळाडूऐवजी दुसऱ्याला बदली खेळाडू खेळण्यासाठी पाठवता येईल.

> चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करता येणार नाही.

> अनलिमिटेड कोरोना सब्सिट्यूट ठेवता येतील. फलंदाजाला फलंदाज, तर गोलंदाजालाही गोलंदाजच रिप्लेस करता येईल.

विराट, बुमराह व गेल रचू शकतात नवे विक्रम

> बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली टी - २० मध्ये ९ हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरू शकतो. यासाठी त्याला फक्त १०० धावा हव्या आहेत.

> ख्रिस गेल टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार षटकार मारणारा पहिला खेळाडू बनू शकतो. यासाठी त्याला आणखी २२ षटकार ठोकावे लागतील.

> जसप्रीत बुमराह टी-२० मध्ये २०० बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गाेलंदाज ठरू शकतो. यासाठी त्याला आणखी १८ विकेट्स हव्या आहेत.