आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएल सीझन 13:पैशामुळे खेळाडूंची लीगला पहिली पसंती, 141 दिवसांत 164 प्रोफेशनली सामने; काेराेनामुळे मल्टिनेशन वर्ल्डकपला स्थगिती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
गत आठवड्यात त्रिनबागाे नाइट रायडर्सने चाैथ्यांदा सीपीएलचा किताब पटकावला. आता यातील खेळाडू हे दुबईला आयपीएलसाठी रवाना झाले.
  • आयपीएलनंतर श्रीलंका व बिग बॅश लीगचे सामने, टी-20 ब्लास्ट होणार आहे

जगातील सर्वात लाेकप्रिय आयपीएलच्या १३ व्या सत्राच्या आयाेजनाला आता काही तास उरले आहे. कोरोनामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आॅस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली. मात्र, टी-२० चे सामने सलग खेळवले जात आहेत. जगभरातील खेळाडू त्यात सहभागी होताहेत. इंग्लंडमध्ये टी-२० ब्लास्टचे सामने खेळवले जाताहेत. आता आयपीएलनंतर श्रीलंका प्रीमियर लीग व पाकिस्तान सुपर लीगचे सामने होतील. आंतरराष्ट्रीय सामने फक्त इंग्लंडमध्ये हाेत आहे. पैशामुळे खेळाडू लीगला प्राधान्य देताहेत.

लीगमुळे खेळाडूंना फायदा :

जर यंदा टी-२० विश्वचषक सामने झाले असते, तर आयपीएल झाले नसते. विश्वचषकात एका संघाला जास्तीत जास्त सात सामने खेळावे लागतात. बीसीसीआय प्रत्येक टी-२० खेळाडूला ३ लाख रुपये देते. एका खेळाडूला सामना निधी जास्तीत जास्त २१ लाख मिळताे. आयपीएलमध्ये आपल्या सिनिअरला ५ ते १७ काेटी रुपये मिळतात. देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जात आहे.

१४१ दिवसांत ५ लीग: १६४ सामने

१९ सप्टेंबरपासून आयपीएल आहे. १० नोव्हेंबरपर्यंत स्पर्धेत ६० सामने होतील. इंग्लंडमध्ये २७ ऑगस्टपासून टी-२० ब्लास्ट आहे. १९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान लीगमध्ये १६ सामने होतील. त्यानंतर १४ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये २३ सामने खेळवले जातील. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान सुपर लीगच्या बाद फेरीतील उर्वरित चार सामने होतील.

कोराेना काळात ८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय सामन्यास सुरुवात झाली. आतापर्यंत २४ सामने खेळवण्यात आले. यात कसोटी, वनडे आणि टी-२० चा समावेश आहे. दुसरीकडे, टी-२० लीगचा विचार केल्यास कॅरेबियन प्रीमियर लीगचे एकूण ३३ सामने व टी-२० ब्लास्टचे ९७ पैकी ९१ सामने १९ सप्टेंबरपूर्वी खेळवण्यात आले.

व्ह्यूअरशिप : ३० टक्के वाढ होण्याची आहे अपेक्षा

यंदा व्ह्यूअरशिपमध्ये विक्रमी वाढ हाेण्याची शक्यता आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, गेल्या सत्रात १२ टक्के वाढ पाहायला मिळाली होती आणि ४६२ मिलियन व्ह्यूअरने लीग पाहिली होती. त्यामुळे लीगवर एकूण परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा आहे. व्ह्यूअरशपिमध्ये ३० टक्के वाढ होऊ शकते. त्यामुळे या लीगला सध्या चाहत्यांची चांगली पंसती मिळत आहे.

ब्रँड व्हॅल्यू : ५ ते १५ % घसरणीचा आहे धाेका

कोरोनामुळे आयपीएलचे ब्रँड व्हॅल्यू ५ ते १५ टक्क्यांपर्यंत घसरू शकते. २०१९ मध्ये १३.५ टक्के त्यात वाढ झाली होती आणि ४७, ५०० कोटी रुपये होती. फोर्ब्सच्या अहवालानुसार, व्हिवो मुख्य प्रायोजकातून बाहेर झाला आहे. सत्रात ड्रीम-११ मुख्य प्रायोजक आहे. मात्र, व्हिवोच्या तुलनेत २१८ कोटी कमी रकमेत अधिकार मिळवले.