आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल:अँटी करप्शन युनिट दुबईत दाखल; युवा खेळाडूंवर आहे बारीक नजर; व्हिडिआेच्या माध्यमातून हाेणार समुपदेशन

दुबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॅच फिक्सिंगसह इतर गैरव्यवहार राेखण्यासाठी पथक झाले सज्ज!

अनेक माेठ्या आव्हानांना परतवून लावत अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता आयपीएलचे आयाेजन विदेशात करत आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून दुबईमध्ये १३ व्या सत्राच्या आयपीएल स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे. मात्र, या स्पर्धेच्या आयाेजनावर कुठल्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, यासाठी खास खबरदारी घेतली जात आहे. यासाठी बीसीसीआयचे अँटी करप्शन युनिट मंगळवारी दुबईमध्ये दाखल झाले. अजितसिंग यांच्या नेतृत्वाखाली हे युनिट लीगदरम्यान हाेणाऱ्या मॅच फिक्सिंगसह इतर आर्थिक गैरव्यवहारातील धाेका राेखण्यावर भर देणार आहे. यासाठी पथक सज्ज झाले आहे. या पथकामध्ये आठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. हे पथक सहा दिवस क्वाॅरंटाइन झाले आहे. यंदा सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून समुपदेशन केले जाईल.

युवा खेळाडू रडारवर; हालचालींची नाेंद :
लीगदरम्यान या युनिटची नजर खासकरून युवा खेळाडूंवर असेल. पथकाने खास प्लॅन आखला आहे. खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीची या वेळीनाेंद ठेवली जाईल. यातून या लीगच्या सामन्यादरम्यान काेणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार हाेणार नाही, यासाठी पथक अधिक काळजी घेणार आहे. युवकांना आमिष दाखवण्याचा धाेका दूर करणार असल्याचे अजितसिंग म्हणाले.

संघांची गव्हर्निंग काैन्सिलवर नाराजी
लीगमधील सहभागी संघांच्या आठही फ्रँचायझींनी आता आयपीएलच्या गव्हर्निंग काैन्सिलवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. या काैन्सिलने खेळाडूंच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले हाेते. त्यामुळेच सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत फ्रँचायझींनी आता थेट बीसीसीआय अध्यक्ष साैरव गांगुलीकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे या प्रकरणावर गांगुली निर्णय घेणार आहे.

अनुभवी खेळाडूंमुळे सीएसके किताबाचा चाैकार मारणार : वाॅटसन
आमच्या संघाकडे जगातील सर्वात यशस्वी कर्णधार मानल्या जाणाऱ्या धाेनीचे कुशल नेतृत्व आहे. त्यामुळे आमच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर आहे. याशिवाय आमच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघामध्ये अनुभवी खेळाडू आहेत. यातून आम्ही किताबाचा चाैकार मारण्यासाठी उत्सुक आहाेत. आमचा यासाठी प्रबळ दावा असल्याचा विश्वास चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा फलंदाज शेन वाॅटसनने व्यक्त केला. गुणवत्ताधारक फलंदाजांमुळे चॅम्पियन हाेण्याचा पल्ला सहज गाठता येईल, असेही ताे म्हणाला. गतवर्षी चेन्नईचा संघ उपविजेता ठरला हाेता. याशिवाय टीमच्या नावे आतापर्यंत तीन वेळचा आयपीएल चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम नाेंद आहे. सध्या या लीगच्या तयारीवर या टीमने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी खेळाडू मेहनत घेत असल्याचे वाॅटसनने सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser