आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:आयपीएल समालोचन करत असलेल्या डीन जोन्स यांचे मुंबईमध्ये झाले निधन

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीन जोन्स यांनी ऑस्ट्रेलियासाठी 52 कसोटी व 164 वनडे खेळले आहेत

आयपीएल २०२० मध्ये समालोचन करत असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांनी बुधवारी रात्री मुंबई इंडियन्स व कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान झालेल्या सामन्यात समालोचनदेखील केले. गुरुवारी दुपारी त्यांच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे क्रिकेटच्या विश्वाला माेठा धक्का बसला. कारण, त्यांनी मुंबई आणि काेलकाता यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान समालाेचकाची भुमिका यशस्वीपणे बजावली.

यंदाची आयपीएल स्पर्धा सध्या दुबईमध्ये आयाेजित करण्यात आली. या लीगसाठी समालाेचकांचे वेगळे पॅनल तयार करण्यात आले. याच पॅनलमध्ये आॅस्ट्रेलियन माजी क्रिकेयपटू जाेन्स यांचाही समावेश हाेता. यूएईमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेतील अनेक समालोचक मुंबईतील ७ स्टार हॉटेलच्या जैवसुरक्षित वातावरणात थांबले आहेत. येथून ते समालोचन करताहेत. याच पॅनलमध्ये जाेन्स देखील समालाेचकाच्या भुमिकेत काम करत हाेते. गत आठवड्यातच ते यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले हाेते. याच ठिकाणी क्वारंटाइन राहून ते या पॅनलमध्ये सक्रीय झाले.

मेलबर्नमध्ये जन्मलेले जोन्स यांनी १९८४ ते १९९४ दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून ५२ कसोटी आणि १६४ वनडे सामने खेळले. त्यांनी कसोटीत ४६.५५ च्या सरासरीने ३६३१ धावा आणि वनडेत ४४.६१ च्या सरासरीने ६०६८ धावा केल्या आहेत. त्यांनी एकूण १८ शतके झळकावली. जोन्स १९८७ विश्वचषक विजेता संघाचे सदस्य हाेते. त्यांची क्रिकेटच्या विश्वातील कामगिरी सर्वच युवांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. समालोचनासह ते क्रिकेटतज्ञ होते. त्याचबराेबर अनेक संघांचे प्रशिक्षकदेखील होते. पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड आणि कराची किंग्जला मार्गदर्शन केले आहे. २०१७ मध्ये अफगाणिस्तानने त्यांना आपल्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले होते. जगभरातील अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. स्टार इंडियानेदेखील जोन्स यांच्या निधनाबाबत शोकसंदेश जाहीर केला.

बातम्या आणखी आहेत...