आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:बायोबबलमध्ये झोन बनवून राहताहेत क्रिकेटपटू, संक्रमण होऊ नये यासाठी ड्रेसिंग रूममध्ये 35 पेक्षा जास्त लोक राहण्यावर बंदी

दुबई / चंद्रेश नारायणन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएलच्या या हंगामात फ्रॅँचायझीचे कर्मचारीच खेळाडूंना जेवण देत आहेत

क्रिकेटपटू सध्या ‘बायोबबल’मध्ये राहत आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहेच. आयपीएलच्या प्रत्येक फ्रँचायझीच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर कोविड संसर्गापासून बचावासाठी उचललेल्या पावलांवरून ते कळते. खेळाडू, त्यांचे सहायक कर्मचारी, इव्हेंट मॅनेजर्स, स्टेडियम ऑफिसर्स, बीसीसीआयचा स्टाफ व अमिरात क्रिकेट मंडळाचे अधिकारी-कर्मचारी वेगवेगळ्या झोनमध्ये राहत आहेत.

भारतात आयपीएलदरम्यान फ्रँचायझी मोठ्या लवाजम्यासह एका स्टेडियमपासून दुसऱ्या स्टेडियमपर्यंत ये-जा करताना दिसले आहेत. पण सध्या अशी स्थिती आहे की, दुबईत कोणत्याही फ्रँचायझीच्या ड्रेसिंग रूममध्ये ३५ पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीवर बंदी आहे. या ३५ जणांमध्ये १७ खेळाडू, १२ सपोर्ट स्टाफ, ४ लॉजिस्टिक टीमचे आणि २ सुरक्षा अधिकारी आहेत. सामन्याच्या दिवशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ जेथे थांबतो, त्याला झोन-१ म्हटले जाते.

सामनाधिकारी आणि लाच प्रतिबंधक अधिकाऱ्यांव्यतिरिक्त या झोनमध्ये कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नाही. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित व्यक्ती, स्टेडियमचा कर्मचारी, केटरिंगचा स्टाफ एवढेच नव्हे तर ड्रेसिंग रूमच्या अटेंडंटलाही मॅचदरम्यान ड्रेसिंग रूमच्या आसपासही फिरकण्याची संधी नाही. या वर्षी फ्रँचायजीचा लॉजिस्टिक स्टाफच खेळाडूंना जेवणही देत आहे. बबलबाहेरील कुठल्याही व्यक्तीचा त्यांच्याशी संपर्क होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. खेळपट्टीची देखभाल करणाऱ्या ग्राउंड स्टाफलाही फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियम-कायद्यांचे पालन करत काम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्वी मैदानावर ‘स्टार स्पोर्ट्स’ चे ६० लोक हजर राहत असत, पण या वर्षी दुबईत त्यांची संख्या नगण्य आहे. नाणेफेकीची वेळ असो की मग सामन्यानंतरचा प्रेझेंटेशन सोहळा, खेळाडूंना समालोचकांपासून अंतर ठेवून राहावे लागत आहे. आपण टीव्हीवर सायंकाळी ७.३० वाजेपासून सामना पाहण्यास सुरुवात तर करतो, पण त्यासाठी किती मेहनत आणि तयारी करावी लागतेय, याचा अंदाजही बांधता येत नाही.

आयपीएल सुरू होऊन २० दिवस उलटले, पण अजून डोप टेस्ट झाली नाही
आयपीएल-१३ सुरू होऊन २० दिवस उलटले आहेत, पण खेळाडूंची डोप टेस्ट सुरू झाली नाही. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीची (नाडा) टीम यूएईत दाखल झालेली नाही. नाडाचे अधिकारी यूएईला जाण्यासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. पण नाडाचा हा तर्क योग्य नाही, कारण खेळाडूंसह लीगचे संपूर्ण व्यवस्थापन यूएईला गेलेले आहे. पुढील आठवड्यात नाडाचे अधिकारी यूएईला जाऊ शकतात. चाचणीसाठी ५ केंद्रे बनवली जातील आणि ५० खेळाडूंचे नमुने घेतले जातील, असे आधी सांगितले गेले होते. पण एकतृतीयांश सामने होऊन गेले तरी अद्यापही चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser