आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
IPL च्या 13 व्या सत्रातील अंतिम सामन्यात डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियंस (MI) ने दिल्ली कॅपिटल्स (DC) वर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईने IPL मध्ये सलग दुसरा आणि ओव्हरऑल पाचवा किताब जिंकला. स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
This one's for you, Paltan 💙💙💙💙💙pic.twitter.com/tcnKv41hhs
— Mumbai Indians (@mipaltan) November 10, 2020
दुबईच्या मैदानावर दिल्लीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 157 रनांचे टार्गेट दिले होते. प्रत्युत्तरात मुंबईने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 157 रन काढले. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने शानदार खेळी करत 51 बॉलमध्ये 68 आणि ईशान किशनने 19 बॉलमध्ये 33 रन केले.
रोहित-डिकॉकने वेगवान सुरुवात करुन दिली
मुंबई इंडियंसला कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकने वेगवान सुरुवात करुन दिली. दोघांनी 45 रनांची ओपनिंग पार्टनरशिप केली. यानंतर दिल्लीच्या स्टोइनिसने डिकॉकला 20 रनांवर आउट केले. यानंतर 90 रनांवर टीमने दुसरी विकेट गमावली. सुर्यकुमार (19) रनआउट झाला. यानंतर रोहितने ईशानसोबत तिसऱ्या विकेटसाठी 47 रनांची पार्टनरशिप केली.
दिल्लीने 7 विकेट गमावून 156 रन काढले. कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 64 आणि ऋषभ पंतने 56 रनांची धडाकेबाज खेळी केली. IPL मध्ये अय्यरचे 16 वे आणि पंतचे 12वे अर्धशतक झाले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 69 बॉलवर 96 रनांची पार्टनरशिप केली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने 3 , कूल्टर नाईलने दोन आणि जयंत यादवने एक विकेट घेतली.
दिल्लीने 22 रनांवर 3 विकेट गमवल्या
दिल्लीची अतिशय खराब सुरुवात झाली. संघाने 22 रनांवर 3 विकेट गमवल्या. ओपनर शिखर धवन (15) ला जयंत यादवने क्लीन बोल्ड केले. ट्रेंट बोल्टने दिल्लीला सुरुवातीलाच 2 धक्के दिले. बोल्टने मार्कस स्टोइनिसला सामन्याच्या पहिल्याच बॉलवर आउट केले. यानंतर अजिंक्य रहाणेलाही 2 रनांवर विकेटकीपर क्विंटन डिकॉककडे झेलबाद केले.
बोल्ट पावर-प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला
एका सीजनमध्ये पावर-प्ले दरम्यान सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत ट्रेंट बोल्टने मिशेल जॉनसनच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. दोघांनी पावर-प्ले मध्ये 16-16 विकेट घेतल्या आहेत. बोल्टने 36 ओवर केले, यात 13.5 चा स्ट्राइक रेट आणि 6.72 च्या इकोनॉमीने 16 फलंदाजांना आउट केले.
दोन्ही संघ
मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, नाथन कूल्टर-नाइल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव आणि जसप्रीत बुमराह.
दिल्ली: शिखर धवन, मार्कस स्टोइनिस, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, प्रवीण दुबे, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.