आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
१९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा लेग स्पिनर रवी बिश्नोई किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याने आपल्या कामगिरीने जगातील फलंदाजांना अडचणीत आणले. त्याने आतापर्यंत आठ सामन्यांत ८ बळी घेतले. १९ वर्षांखालील विश्वचषकापेक्षा आयपीएल खूप वेगळे आहे. गोलंदाजाकडे ४ षटके असतात. अशात चूक झाल्यास पुनरागमनाची शक्यता कमी असते. सध्या लक्ष टी-२० लीगवर आहे. भारतीय संघाबाबत विचार करत नाही, असे ताे म्हणाला.
> आयपीएलमध्ये अनेक मोठ्या फलंदाजांची विकेट घेतली. समोर मोठा फलंदाज असल्यावर दबाव वाढतो का?
मी समोर किती मोठा खेळाडू आहे, या विचाराने गोलंदाजी करत नाही. हे, खरे आहे की, आयपीएलमध्ये तुम्हाला जगातील उत्कृष्ट फलंदाजांसमोर गोलंदाजी करण्याची संधी मिळते. ज्यामुळे आत्मविश्वास देखील वाढतो. यातून कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी माेठी मदत हाेते. हे सातत्याने सिद्ध झाले आहे.
> प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याकडून काय नवीन शिकण्यास मिळाले?
त्यांच्याप्रमाणे मीदेखील लेग स्पिनर आहे. दबावात कशा प्रकारे गोलंदाजी करायची, हे त्यांनी संांगितले. फ्लिपरवर देखील त्यांच्यासोबत खूप मेहनत घेतली. कोणत्याही खेळाडूसाठी आयपीएल मोठे व्यासपीठ आहे. येथे चांगल्या कामगिरीने ओळख निर्माण होते. मी आपले १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो. पुढील विचार अद्याप केलेला नाही.
> तू राउंड द विकेट व ओव्हर द विकेट दोन्हीकडून गोलंदाजी करतोय. त्याचे मागचे काय कारण?
मी १९ वर्षांखालील असताना एकदा अशी गोलंदाजी केली होती. तेव्हा माझे प्रशिक्षक शाहरुख (पठाण) आणि प्रद्योतने (सरेचान) नेट्समध्ये माझा सराव करून घेतला. यूएईमध्ये देखील कुुंबळे सरांनी नेट्समध्ये त्यावर खूप मेहनत घेतली. त्यांनी म्हटले, तू करू शकतो, त्यामुळे मी प्रयत्न केला. मी संघात सर्वात लहान आहे. त्यामुळे मला सर्व जण सहकार्य करतात.
> टीम चांगली कामगिरी करतेय. मात्र, चांगला निकाल पाहायला मिळत नाही. अशात ड्रेसिंग रूमचे वातावरण कसे असते?
चांगले करून देखील पराभूत झाल्यावर ड्रेसिंग रूममधील वातावरण निराशाजनक असते. प्रशिक्षक कुंबळे, कर्णधार राहुल आणि व्यवस्थापनाचा माझ्यावर विश्वास आहे. माझ्यासाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांच्या विश्वासास पात्र ठरणे आणि आपले १०० टक्के योगदान देण्याचा माझा प्रयत्न असतो.
> १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळणे व येथे आयपीएलमध्ये खेळणे यात काय फरक जाणवतो?
एवढाच फरक आहे, आयपीएलमध्ये चूक केल्यास पुनरागमन करण्याची शक्यता खूप कमी असते. कारण, यादरम्यान स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला फार कमी वेळ असताे. म्हणजे केवळ चार षटके असतात, त्यात जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू असतात. १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वच युवा खेळाडू असून ५० षटकांचा सामना असतो. एक षटक चांगले पडले नाही तरी परतण्याची शक्यता असते. कारण, त्यामुळे पुन्हा संधी मिळणेही फार कठीण हाेऊ जाते.
> गावसकरांनीही तुझे कौतुक केले. मोठा रनअप घेणारा लेग स्पिनर पाहिला नाही?
ते नैसर्गिक आहे. मी पहिले मध्यम गती गोलंदाज होतो. यातील दर्जेदार कामगिरी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली हाेती. मात्र, यात बदल करण्याचे मला सुचवण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षकांनी सांगितले की, फिरकी गोलंदाजी कर.
> पहिल्यांदा आयपीएल खेळतोय. प्रेक्षक नाहीत, त्यामुळे निराशा आहे का?
होय, ती गोष्ट चुकल्यासारखी वाटते. सवाई मानसिंग स्टेडियममध्ये राजस्थानच्या खचाखच भरलेल्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा आनंद काही वेगळाच आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.