आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएल:शेवटच्या 4 षटकांत गोलंदाज 11.94 च्या सरासरीने धावा देताहेत, आतापर्यंत झालेल्या कोणत्याही टी-20 स्पर्धेपेक्षा सर्वाधिक

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लीगच्या सुरुवातीच्या 12 सामन्यांत 17 ते 20 षटकांदरम्यान 70 षटकार व 74 चौकार मारले

आयपीएलच्या १३ व्या सत्रातील १२ सामने झाले आहेत. सर्व संघांचा एक-एक विजय आणि पराभव झाला. अशात कोणत्या एका संघाचे पारडे जड आहे असे म्हटले जाऊ शकत नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संघ त्रयस्थ ठिकाणी म्हणजे विदेशात खेळत आहे. त्रयस्थ ठिकाण असल्याने कोणत्याच संघाला घरच्या मैदानाचा फायदा मिळत नाही. यंदा सर्व ८ संघांना एक-एक सामना जिंकण्यासाठी ११ सामने खेळावे लागले, जे गतसत्रापैकी १७ सामन्यांनी कमी आहेत. गतसत्रात २८ सामन्यांनंतर असे हाेते. सर्वात कमी १० सामन्यांनंतर सर्व टीमचा एक-एक सामना जिंकण्याचा विक्रमदेखील बाहेरच झाला आहे. २००९ मध्ये आफ्रिकेत लीगचे सामने खेळवण्यात आले होते तेव्हा ही कामगिरी झाली. त्याचप्रमाणे अखेरच्या ४ षटकांत ११.९४ च्या रनरेटने गोलंदाज धावा देताहेत, ज्या आतापर्यंत झालेल्या कोणत्याही टी-२० स्पर्धेच्या तुलनेत सर्वाधिक आहेत.

६ मॅच : शेवटच्या ४ षटकांत ६०+ धावा नाेंद
लीगच्या यंदाच्या सत्रातील सुरुवातीच्या १२ सामन्यांचा विचार केल्यास ६ सामन्यांत अखेरच्या ४ षटकांत ६० पेक्षा अधिक धावा बनल्या. हे दुबळ्या आणि सुमार गोलंदाजांमुळे झाले असे नाही. जसप्रीत बुमराह व डेल स्टेनला एका षटकात २५ पेक्षा अधिक धावा निघाल्या. अखेरच्या ४ षटकांत सरासरी ११.९४ च्या रनरेटने धावा बनत आहेत. यादरम्यान आतापर्यंत ७० षटकार व ७४ चौकार लागले. पॉवरप्लेमध्ये फलंदाज सांभाळून खेळत आहेत.

चार वेळचा चॅम्पियन संघ मुंबई सहाव्या आणि चेन्नई आठव्या स्थानावर
लीगची गुणतालिका पाहिल्यास सध्याची चॅम्पियन व सर्वाधिक ४ वेळा किताब जिंकणारी मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानी आहे. गेल्या वर्षीची उपविजेता व तीन वेळची चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज आठव्या क्रमांकावर घसरली. २०१६ मध्ये प्रत्येक संघाला कमीत कमी एक सामना जिंकण्यासाठी १२ सामने लागले होते.