आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KKR vs DC:कोलकाता नाइट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय, वरुण चक्रवर्तीने घेतल्या 5 विकेट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 42 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात अबुधाबीत झाला. या सामन्यात कोलकाताने दिल्लीला 59 धावांनी पराभूत केले. कोलकाताने दिल्लीला 195 धावांचे लक्ष्य दिले होते. दिल्लीचा संघ 20 ओव्हरमध्ये 135 धावा काढू शकले. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने आपल्या आयपीएल करियरची सर्वश्रेष्ठ कामगिरी केली. चक्रवर्तीने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 5 विकेट घेतल्या. स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दिल्लीसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 47 रन केले. याशिवाय ऋषभ पंतने 27 रन केले. तर, केकेआरसाठी वरुणशिवाय पॅट कमिंसने 3 आणि लोकी फर्ग्यूसनने एक विकेट घेतली.

कोलकाताने 6 विकेटवर 194 रन केले

कोलकाताकडून नीतीश राणा (81) आणि सुनील नरेन (64)च्या अर्धशतकी खेलीमुळे कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 194 रन केले. राणाचे आयीपीएलमध्ये 10वे आणि नारायणचे चौथे अर्धशतक होते. दिल्लीकडून एनरिच नोर्तजे, कगिसो रबाडा आणि मार्कस स्टोइनिसने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

राणाने आपल्या सासऱ्याला ट्रिब्यूट दिले

राणाने मॅचदरम्यान आपल्या दिवंगत सासरे सुरिंदर मारवाहला एक इमोशनल ट्रिब्यूट दिले. त्यांचे शुक्रवारी कँसरमुळे निधन झाले होते. अर्धशतक केल्यानंतर राणाने आपली जर्सी दाखवली, ज्यावर सुरिंदर नाव लिहीले होते.

कोलकाताने पावर-प्लेमध्ये 2 विकेट गमवल्या

कोलकातासाठी नीतीश राणाने शुभमन गिलसोबत ओपनिंग केली. गिलने फक्त 9 रन काढून एनरिच नोर्तजेच्या बॉलवर अक्षर पटेलला कॅच दिली. यानंतर राहुल त्रिपाठी (13) ला नोर्तजेने बोल्ड केले. कोलकाताने पावर-प्लेमध्ये 2 विकेट गमावून 36 रन केले.

या सीझनमध्ये शारजाहमध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकाताला 18 धावांनी पराभूत केले होते. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 4 गडी बाद 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाता 8 गडी बाद 210 धावांपर्यंत मजल मारू शकली.

दोन्ही संघ

कोलकाता: शुभमन गिल, सुनील नरेन, नीतीश राणा, राहुल त्रिपाठी, इयोन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), पैट कमिंस, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.

दिल्ली: शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेट कीपर), मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, तुषार देशपांडे आणि एनरिच नोर्तजे.