आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमध्ये आज:विजयी चाैकार मारणाऱ्या पंजाबच्या किंग्जचे आज केकेआरसमाेर आव्हान

दुबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारजा क्रिकेट स्टेडियममध्ये सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाब व कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान व्हर्च्युअल क्वार्टर फायनल होईल. पंजाबने गत सामन्यात १२७ धावा असतानाही हैदराबादवर विजय मिळवला होता. लाेकेश राहुलच्या नेतृत्वातील टीम सलग चार सामने जिंकली. त्यांच्यासाठी स्पर्धेतील पहिला हाफ खराब ठरला, आता शानदार पुनरागमन केले. जखमी मयंक अग्रवाल बाहेर होऊ शकतो. गेल आणि पूरनने सलग चांगली कामगिरी केली. मात्र, ग्लेेन मॅक्सवेलच्या फाॅर्मची चिंता कायम आहे. युवा फिरकीपटू रवी बिश्नोई व मुरूगन अश्विन लयात आहे. अर्शदीप सिंग व क्रिस जॉर्डनने शमीला चांगली साथ देताहेत. दुसरीकडे, कोलकाताचा अंतिम ११ चा क्रम अद्याप अस्थिर आहे. नितीश राणा फाॅर्मात आला.

सुनील नरेनने देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. त्याची गत सामन्यातील कामगिरीही लक्षवेधी ठरली. त्यामुळे आता हीच लय कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे आता त्याच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असेल. मात्र, युवा खेळाडू शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठीच्या कामगिरीत घसरण होतेय. अनुभवी दिनेश कार्तिक व मॉर्गनला सुधारणा करण्याची गरज आहे. वरुण चक्रवर्तीने अंतिम ११ त कुलदीप यादवच्या जागी स्वत:ला सिद्ध केले. या सर्व कारणांमुळे आता दोन्ही संघांत संघर्षपूर्ण सामना पाहायला मिळेल.

कोलकाता नाइट रायडर्स संघाचे पारडे जड
दोन्ही संघांदरम्यान झालेल्या २६ सामन्यांत कोलकाताने १८ आणि पंजाबने केवळ ८ सामने जिंकले. यंदाच्या सत्रात दोघांतील पहिला सामना कोलकाताने २ धावांनी जिंकला होता.

बातम्या आणखी आहेत...