आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएलमध्ये आज:रॉयल चॅलेंजर्सच्या आव्हानाचा सामना करण्यास कोलकाता सज्ज; यंदाच्या सत्रात दोन्ही संघांनी 4-4 सामने जिंकले आहेत

दुबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रॉयल चॅलेंजर्सच्या आव्हानाचा सामना करण्यास कोलकाता सज्ज

कोलकाता नाइट रायडर्सला पराभवातून विजय मिळवण्याची सवय झाली. जेव्हा कठीण परिस्थितीत असतात, तेव्हा मार्ग शोधूनच काढतात. अखेरच्या दोन सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज व किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध अशी कामगिरी केली, ज्यामुळे स्पर्धेत त्याचे स्थान चांगले झाले. जेव्हा सोमवारी रात्री शारजा क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल, तेव्हा नशीब असेच साथ देईल. दुसरीकडे, बंगळुरूचा प्रवास चढ-उताराचा ठरला. चेन्नईवर विजय मिळवल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. पहिले कोलकाताबाबत बोलायचे झाले तर, त्यांची फलंदाजी आता स्थिर झाली आहे.

बंगळुरूची गोलंदाजी धारदार होत आहे
बंगळुरू बाबत सर्वांन सारखी परिस्थिती आहे. ते देखील योग्य ट्रकवर येताना दिसताय. कोहली लयात आला आहे. विशेष म्हणजे त्यांचे गोलंदाज फार्मात आले. क्रिस मॉरिसच्या पुनरागमनाने आक्रमकता वाढली. नवदीप सैनी, यजुवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर हे धारदार बनत आहेत. शारजाच्या छोट्या मैदानावर रोमांचक लढत व षटकारांचा पाऊस पहायला मिळेल.