आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलंदाजी अॅक्शन:कोलकात्याच्या सुनील नरेनला मिळाली क्लीन चिट!

अबुधाबी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू सुनील नरेनला संदिग्ध गोलंदाजी शैलीवर आयपीएलच्या गोलंदाजी अॅक्शन समितीने क्लीन चिट दिली. लीगने ही माहिती दिली. पंजाबविरुद्ध सामन्यात मैदानी पंचांनी त्याच्या गोलंदाजी शैलीविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर ताे आपल्या शैलीवर काम करत होता. टीमने नरेनच्या शैलीवर अधिकृत परीक्षण करण्याची विनंती केली होती. मात्र, क्लीन चिट मिळाल्यानंतरही त्याला हैदराबादविरुद्ध रविवारच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

दुसरीकडे, कोलकाताने जखमी अमेरिकन गोलंदाज अली खानच्या जागी न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टिम सिफर्टला आपल्या तंबूत घेतले. अली खानसारखे सिफर्टदेखील कॅरेबियन प्रीमियर लीग २०२० मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा सदस्य होता.

बातम्या आणखी आहेत...