आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KKR vs RCB:बंगळुरुकडून कोलकाताचा 82 धावांनी पराभव:केकेआरविरुद्ध आरसीबीचा सर्वात मोठा विजय

शारजाह3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्णधार कार्तिक सह 8 खेळाडून 10 धावाही काढू शकले नाही

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 28वा सामना आज कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) दरम्यान शारजाहमध्ये झाला. यात बंगळुरुकडून कोलकाताचा 82 धावांनी पराभव झाला. बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत कोलकाताला 195 धावांचे लक्ष्य दिले होते. या विजयासट बंगळुरू टॉप-3 मध्ये पोहचली आहे. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

हा बंगळुरूचा कोलकाताविरोधात सर्वात मोठा विजय आहे. कोलकाताच्या कर्णधार दिनेश कार्तिकसह 8 खेळाडून 10 रनही काढू शकले नाहीत. कोलकाताकडून सर्वाधिक 34 धावा शुभमन गिलने केल्या.

बंगळुरूकडून एबी डिविलियर्सने अवघ्या 33 बॉलवर 73 रन केले. तर, आंद्रे रसेलने ओव्हरऑल टी-20 मध्ये 300 विकेट पूर्ण केल्या. देवदत्त पडिक्कल 32 धावा काढून आंद्रे रसलच्या चेंडूवर आउट झाला. त्यानंतर एरॉन फिंचला प्रसिद्ध कृष्णाने आउट केले. दोघांमध्ये 67 रनांची पार्नरशिप झाली.

​​​​​​​दोन्ही संघ

कोलकाता: राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नीतीश राणा, इयोन मोर्गन, दिनेश कार्तिक (कर्णधार आणि विकेटकीपर), टॉम बेंटन, आंद्रे रसेल, पॅट कमिंस, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.

बंगळुरू: देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, इसुरु उडाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.

पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात सुनील नारायणला वॉर्निंग मिळाली होती

शनिवारी किंग्स इलेवन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात नारायणला आक्षेपार्ह बॉलिंग अॅक्शनसाठी अंपायर उल्हास गांधे आणि क्रिस गैफनीने वार्निंग दिली होती. यानंतर बीसीसीआयच्या आक्षेपार्ह गोलंदाजी अॅक्शन कमेटीने नरेनचे नाव आपल्या वॉर्निंग लिस्टमध्ये सामील केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser