आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल-13:कोलकाता नाइटरायडर्स व चेन्नई सुपरकिंग्ज सामना आज, दाेन्ही संघांचे आतापर्यंत प्रत्येकी दाेन विजय

अबुधाबी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबीच्या शेख झाएद स्टेडियममध्ये उतरताना दोन्ही संघांच्या मनात अनेक प्रश्न असतील. चेन्नई सुपरकिंग्ज व कोलकाता नाइटरायडर्स दोघांना खूप मेहनत घेण्याची गरज आहे. मात्र, कोलकाताचे पारडे जड दिसते. टीम खूप संतुलित आहे. तरीदेखील त्यांच्या समस्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात ते विजयासमीप पोहोचले, मात्र जिंकू शकले नाहीत. कारण त्यांची चुकीची फलंदाजी क्रमवारी. नरेन सलामी फलंदाज म्हणून अपयशी ठरला, मात्र संघाला त्याच्यावर अद्याप विश्वास आहे. तो सलग अपयशी ठरल्याने संपूर्ण फलंदाजीवर त्याचा दबाव येतो. शुभमन गिलमध्ये विश्वास वाढतो, नितीश राणाने चांगली कामगिरी केली.

सर्वात मोठी अडचण कर्णधार दिनेश कार्तिकचे अपयश आहे. तो इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनपूर्वी फलंदाजीसाठी येतोय. आंद्रे रसेलने अद्याप प्रभावी कामगिरी केली नाही. आता स्पर्धेतील दुसरी सर्वाधिक स्फोटक मधली फळी स्वत:ला कसे तयार करते, हे पाहणे रंजक ठरेल. राहुल त्रिपाठीने फलंदाजीत जीव ओतला. त्याने संघाला दिल्लीविरुद्ध विजयासमीप आणले होते. मात्र, त्याला सलामीची संधी देण्याने संघासाठी फायदेशीर ठरणारे अाहे.

चेन्नई संघाने १३ सामने जिंकले, कोलकाता ७ लढतीत विजयी
दोन्ही संघांत आयपीएलमध्ये २१ सामने खेळवण्यात आले. यात चेन्नईने १३ आणि कोलकाताने ७ सामन्यांत विजय मिळवला. एका सामन्याचा निकाल आला नाही. गत सत्रात चेन्नईने दोन सामने आपल्या नावे केले. अबुधाबीमध्ये चेन्नईने मुंबईला हरवले होते. दुसरीकडे, कोलकाताचा दोन सामन्यांत एक विजय व एक पराभव झाला.

केदार जाधवचे अपयश चेन्नई टीमसाठी अडचणीचे
चेन्नईने किंग्ज इलेव्हन पंजाबवर १० गड्यांनी विजय मिळवून स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले. वॉटसन आणि फाफ डुप्लेसिस फाॅर्मात आल्याने मधली फळी मजबूत झाली. कर्णधार धोनीची लय आणि त्याचा फलंदाजी क्रम अद्याप निश्चित नाही. त्यांच्या नव्या गोलंदाजी क्रमात विविधता आहे आणि धोनीच्या आवडतीचा आहे. केदार जाधवचे अपयश संघासाठी मोठ्या अडचणीचा विषय आहे. संघ त्यावर कशी मात करतो, हे पाहावे लागेल? जडेजादेखील धावा देतोय, मात्र नव्या चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी ती चिंता कमी केली आहे. कोलकाता मजबूत टीम दिसतेय. चेन्नईकडेदेखील विजयाचे चांगले गणित आहे. त्यामुळे हे पाहणे रंजक ठरेल, बुधवारी रात्री कुणाचे पारडे जड राहील?

बातम्या आणखी आहेत...