आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KKR vs RR:कोलकाताकडून राजस्थानचा 60 धावांनी पराभव:7 व्या विजयासह KKR प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम, रॉयल्स टुर्नामेंटमधून बाहेर

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 13 व्या सत्रातील 54वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) दरम्यान दुबईत झाला. या सामन्यात कोलकाताकडून राजस्थानचा 60 धावांनी पराभव करण्यात आला. राजस्थानने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर, फलंदाजी करत कोलकाताने राजस्थानला 192 धावांचे टार्गेट दिले होते. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ 131 धावांवर सर्रबाद झाले. कोलकताकडून पॅट कमिंसने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्यानंतर मावी आणि चक्रवरी 2-2 आणि कमलेश नागरकोटीने एक विकेट घेतली. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

कोलकाताचा कर्णधार इऑन मोर्गनने 35 बॉलवर सर्वाधिक 68 रन केले. मॉर्गनची या सीजनमध्ये पहिले आणि आयपीएलमध्ये पाचवे अर्धशतक लगावले.​​​​​​​ मोर्गनसोबत राहुल त्रिपाठीने 34 बॉलवर 39 आणि शुभमन गिलने 24 बॉलवर 36 रन काढले. अखेर आंद्रे रसेलने 11 बॉलवर 25 रन काढून संघाला चांगल्या स्कोअरवर नेले. राजस्थानकडून राहुल तेवतियाने 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याशिवाय कार्तिक त्यागीने 2 आणि जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपालने 1-1 विकेट घेतल्या.

दोन्ही संघ

कोलकाता: शुभमन गिल, नीतीश राणा, सुनील नरेन, इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, पैट कमिंस, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती.

राजस्थान: रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, स्टीव स्मिथ (कर्णधार), संजू सैमसन (विकेटकीपर), जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, वरुण एरॉन आणि कार्तिक त्यागी.

मोठा विजय आवश्यक

दोन्ही संघात हा सामना एलिमिनेटरप्रमाणे आहे. दोन्ही संघाचे 12-12 पॉइंट्स आहेत आणि टॉप-3 संघाचे पॉइंट्स 14 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे हा सामना पराभूत होणारा संघ टुर्नामेंटमधून बाहेर जाईल. दोन्ही संघांना या सामन्यात फक्त विजय मिळवणे गरजेचे नसून, रनरेट वाढवण्यासाठी मोठा विजय आवश्यक आहे. सनराइजर्स हैदराबादचे नेट रनरेट या दोन्ही संघांपेक्षा जास्त असून, हैदराबादचा एक सामना बाकी आहे. त्यामुळे हा सामना जिंकून कोलकाता-राजस्थानचे प्ले-ऑफचे तिकीट पक्के होणार नाही. त्यासाठी मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागेल.